मुरगूड (शशी दरेकर) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील दोन मल्लांनी आपल्या वजनी गटात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकावले.पै. रोहित येरुडकर यांने फ्री स्टाईल व पैलवान आदिनाथ माने याने ग्रीको रोमन या कुस्ती साठी त्यांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे.
या पैलवानाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीण सिंह पाटील यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य एस पी पाटील, उपप्राचार्य व्ही जी घोरपडे, उपमुख्याध्यापक यू.सी पाखरे, पर्यवेक्षक ए. एन. पाटील, तंत्र विभाग प्रमुख पी.बी. लोकरे, कार्यालय प्रमुख एम एस कांबळे यांची प्रेरणा लाभली वस्ताद तुकाराम चोपडे क्रीडाशिक्षक शामली डेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या झेपीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
