मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी मंडलिक गटाचे नारायण गणपतराव मुसळे ( चिमगांव ) यांची निवड झाली.
Advertisements
नारायण मुसळे यांनी सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. मुरगूड येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संचालक आहेत . चिमगावातील विविध संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत . त्याबरोबरच त्यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग असतो.
Advertisements

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे . त्यांच्या या निवडीस माजी खास. संजय मंडलिक व पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
.