अहवाल सालात संस्थेला २१ लाख १० हजार निव्वळ नफा – सभापती किरण गवाणकर
मुरगूड ( शशी दरेकर ) -मुरगूड तालुका कागल येथिल विश्वनीय संस्था म्हणून नावारूपास आलेली व सर्वपरिचीत आणि जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सभागृहात सपन्न झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती किरण गवाणकर होते.

सभेच्या प्रारंभी प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन संस्थेचे सभासद पंडित मेंगाणे , आनंदा खराडे , दिपक शिंदे, आप्पासो खराडे, रघुनाथ कांबळे , यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सहकार , शिक्षण , व विविध क्षेत्रातील ज्ञात -अज्ञात दिवंगत सभासद,यानां श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी १० वी १२वी गुणवत्ताधारक पाल्यांचा यथोचित सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली .
यावेळी बोलतानां सभापती गवाणकर म्हणाले संस्थेची सांपत्तिक स्तिथी भक्कम असुन ठेवी २५ कोटी ४७ लाख , कर्ज वाटप २० कोटी१९ लाख ४९ हजार त्यापैकी १४ कोटी ७४ लाख२७ हजार सोनेतारण सुरक्षित कर्ज , गुंतवणूक ८ कोटी ७३ लाख , ९३ हजार , तर वार्षिक उलाढाल १५९ कोटी १६लाख , ८५ हजार , खेळते भांडवल३० कोटी ३१ लाख ८७ हजार न तर संस्थेला आर्थिक वर्षात २१ लाख१० हजार इतका निव्वळ नफा झालेचे गवाणकर म्हणाले .

याप्रसंगी प्रास्ताविकात संचालक प्रशांत शहा म्हणाले संपूर्ण संगणकीकृत सेवा , जलद व तप्तर सेवा , आकर्षक व विश्वासार्ह कारभार , आकर्षक ठेव योजना , स्वमालकीची इमारत , कर्तव्यदक्ष संचालक मंडळ , सेवाभावी सेवक वर्ग अशी संस्थेची वैशिष्टे आहेत याचबरोबर लवकरच संस्थेची अद्यावत व सुसज्य अशी इमारत बांधकाम सुरू करण्याचा संचालक मंडळाने निर्णय
घेतलयाचे सांगितले .
यावेळी नवनाथ डवरी, सुनिल कांबळे, श्रीकांत खोपडे, राजू कुडवे, दिपक शिंदे, यानी चर्चेत सहभाग घेतला.
सुत्रसंचालन एन .डी. पाटील यानीं केले , अहवाल वाचन मॅनेंजर सुदर्शन हुंडेकर यानी केले .सभासदानी सर्व विषयानां एकमताने मंजूरी दिली .तर संचालक संदीप कांबळे यानी आभार मानले .
यावेळी उपसभापती प्रकाश सणगर , संचालक सर्वश्री प्रशांत शहा , शशिकांत दरेकर , साताप्पा पाटील , हाजी धोंडीबा मकानदार , नामदेवराव पाटील , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव , कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर ,यांच्यासह कर्मचारी वर्ग , महिला कर्मचारी, व सभासद उपस्थित होते .