मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री . व्यापारी नागरी सह. पतसंस्थेला ७५ लाख ढोबळ नफा – सभापती किरण गवाणकर

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड तालुका कागल येथिल विश्वनीय संस्था म्हणून नावारूपास आलेली व सर्वपरिचीत आणि जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला ७५ लाखाचा ढोबळ नफा झालेची माहिती सभापती श्री. किरण गवाणकर यानी दिली.

Advertisements

यावेळी बोलताना गवाणकर म्हणाले संस्थेची सांपत्तिक स्तिथी भक्कम असुन वसुलभागभांडवल ४९ लाख ७५ हजार राखीव व इतर निधी १ कोटी ४३ लाख , ठेवी २५ कोटी ४७ लाख , इतर तरतूदी १ कोटी २५ लाख , रोख व बँक शिल्लक २४ लाख ४१ हजार , गुंतवणूक ८ कोटी ७३ लाख , मालमत्ता २७ लाख ६४ हजार , कर्जे २० कोटी १९ लाख यापैकी १४ कोटी ७४ लाख सोने – तारण हे सुरक्षित कर्ज आहे , इतर येणी ४४ लाख ८ हजार , खेळते भांडवल ३० कोटी ३२ लाख ,उलाढाल १५९ कोटी९ लाख झाली आहे . असून थकबाकी अल्प प्रमाणात आहे स्टेशनरी १ लाख २१ हजार रूपयाची शिल्लक आहे अशी माहितीही गवाणकर यानीं यावेळी दिली.

Advertisements

याप्रसंगी संचालक प्रशांत शहा म्हणाले संपूर्ण संगणकीकृत सेवा , जलद व तप्तर सेवा , आकर्षक व विश्वासार्ह कारभार, आकर्षक ठेव योजना, स्वमालकीची इमारत, कर्तव्यदक्ष संचालक मंडळ, सेवाभावी सेवक वर्ग अशी संस्थेची वैशिष्टे आहेत याचबरोबर पुढील काळात लवकरच संस्थेची अद्यावत व सुसज्य अशी इमारत बांधण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलयाचे सांगितले. यावेळी किशोर पोतदार , हाजी धोंडीबा मकानदार यांनी संस्थेविषयी व संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्ल मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपसभापती प्रकाश सणगर , संचालक सर्वश्री किशोर पोतदार , प्रशांत शहा , शशिकांत दरेकर , साताप्पा पाटील , हाजी धोंडीबा मकानदार, नामदेवराव पाटील, निवास कदम , संदिप कांबळे, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह कर्मचारी वर्ग, महिला कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!