मुरगूडच्या हिरकमहोत्सवी लक्ष्मीनारायण पतसंस्थेतर्फै सभासदानां दिपावली भेटवस्तूचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल हिरकमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बुधवार दि .१४ / १० / २०२६ रोजी संस्थेच्या सभागृहात प्रत्येक सभासदानांआधार सूर्यफूलचे दोन कॅन दिपावली भेटवस्तूचे वाटप  उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले.

Advertisements

     प्रथम उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत संस्थेचे जेष्ठ संचालक पुंडलीक नाना डाफळे यानीं केले . त्यानंतर सौ .नेलवीन शाहू फर्नांडीस ब शाहू रुजाम फर्नांडिस यांच्या हस्ते लक्ष्मीनारायण फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी दत्तात्रय धोंडीराम परीट , दत्तात्रय शामराव कदम, सुरेश रामाणे या मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

Advertisements

    यावेळी आपल्या प्रास्ताविकात चेअरमन किशोर पोतदार यानीं संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्यकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच जेष्ठ संचालक जवाहर शहा यानीं संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल आपले विचार मांडले . त्याचबरोबर दत्तात्रय परीट व दत्तात्रय कदम यानीं संस्थेच्या  पारदर्शक कारभाराची प्रसंशा करत मनोगत व्यक्त केली.

    यावेळी सौ . मालती सुर्यवंशी , अनिल भैरू मगदूम , प्रकाश
अंबाराम शहा , मधूकर बाळू बरकाळे , मनोहर गुंडू आवटे , शंकर दादू पाटील , मारूती नलवडे , अमर पोवार ( सर ) या मान्यवर सभासदानां प्राथमिक स्वरूपात संचालकांच्या हस्ते भेटवस्तूचे वाटप करण्यात आले .

Advertisements



संस्थेच्या सभासद भेटवस्तू कार्यक्रमास उपसभापती दत्तात्रय कांबळे तसेच जेष्ठ संचालक जवाहर शहा, पुंडलिक डाफळे, अनंत फर्नांडिस, दत्तात्रय तांबट , रविंद्र खराडे , विनय पोतदार, चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे, संचालिका सौ . सुजाता सुतार, सौ . सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत जनरल मॅनेंजर  नवनाथ डवरी, सचिव मारूती सणगर, वेगवेगळ्या शाखेतील शाखाधिकारी ,सभासद, ठेवीदार उपस्थित होते.

सभासद भेटवस्तू कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार संचालक विनय पोतदार यानीं मानले .

Leave a Comment

error: Content is protected !!