कागल नगरपरिषदेचा मोठा निर्णय: दुष्काळामुळे शहरात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाणी पुरवठ्यात कपात आणि कडक निर्बंध लागू!

कागल : महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला असून, जलसंपदा विभागाने शासन निर्णयानुसार नागरी स्वराज्य संस्थांना पाणी कपात करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कागल नगरपरिषदेने गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ पासून शहरामध्ये पाणी सोडण्याच्या वेळेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेने नागरिकांना उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

Advertisements

नागरिकांसाठी कडक नियमावली व सूचना:
नगरपरिषदेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी काही सक्त नियम लागू केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे:

Advertisements

नळ कनेक्शनना तोटी (कॉक) बसवणे बंधनकारक: पाणी भरून झाल्यावर तोटी बंद करणे आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. 

पाण्याचा गैरवापर थांबवा: पिण्याचे पाणी शौचालय, गटारामध्ये किंवा रस्त्यावर सोडूनू नासाडी करू नये. 

Advertisements

विद्युत मोटार लावण्यास मनाई: नळाला विद्युत मोटार (पंप) लावून पाणी उपसलेले आढळल्यास, ती मोटार जप्त करून नळधारकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

पाण्याचा अपव्यय टाळा: पाणी साठवण टाक्यांवर ‘फ्लोटिंग व्हॉल्व्ह’ बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा. 

जयसिंगराव तलावाबाबत कठोर नियम: जयसिंगराव तलावामध्ये वाहने धुणे, जनावरे धुणे, किंवा कपडे धुणे यांसारख्या गोष्टींवर बंदी असून असे करताना कोणी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. 

कर्मचाऱ्यांशी अरेरावी नको: पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जास्त पाणी सोडण्यासाठी दबाव आणणे किंवा दमदाटी करणे यांवर प्रतिबंध असून, असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल. 
कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकांना व नळ धारकांना या नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

Leave a Comment

error: Content is protected !!