मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता कागल येथिल ज्ञानेश्वर कॉलनीतील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गुलमोहरांच्या झाडांच्यामुळे कॉलनीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
लालभडक फुलानीं ही झाडे बहरलेली आहेत . या झ़ाडांच्या गळून पडलेल्या लालभडक पाकळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जणू लाल गालीछा अंथरलाय की काय असा भास निर्माण करतो.

मुरगूड नगरपरिषदेचे कर्मचारी भैरवनाथ कुंभार यानीं काही वर्षापूर्वी गुलमोहरांची लहान रोपे रस्त्याच्या दुतर्फा लावली होती.
त्यानां वेळोवेळी पाणी, जनावरापासुन संरक्षण करत व अथक परिश्रम घेऊन या रोपट्यांचे आता मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. जणू कुंभार यानीं ” झाडे लावा , झाडे जगवा ” असा संदेश इतरानां दिला आहे.

गुलमोहराचे झाड छ्त्री सारखे पसरते व थंडगार सावली देते. लालभडक फुलांच्यामुळे परिसर सौंदर्याने खुलून जातो . भैरवनाथ कुंभार यांच्या अथक परिश्रमामुळे ज्ञानेश्वर कॉलनीच्या सौंदर्ययात भर पडली आहे हे नक्की.