मुरगूडचे पत्रकार रवींद्र शिंदे यांना पूर्णा तापी राष्ट्रीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित

मुरगूड (शशी दरेकर) : अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जि. जळगाव तर्फे चौथ्या अखिल भारतीय शिवमराठी साहित्य संमेलनामध्ये आदिशक्ती संत मुक्ताई व्यासपीठावर दै. तरुण भारत संवादचे मुरगूड प्रतिनिधी प्रा. रवींद्र शिंदे यांना पूर्णा -तापी राष्ट्रीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Advertisements

       पत्रकार प्रा. शिंदे यांनी गेली ३२ वर्षे विविध वर्तमानपत्रामध्ये वार्ताहर पदावर काम केले आहे. ते येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराय विद्यालय जुनियर कॉलेजमध्ये राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयाची सेवानिवृत्त उपप्राचार्य आहेत.

Advertisements

ते यापूर्वी कास्ट्राईब कार्यसम्राट पुरस्काराने सन्मानित असून २०२५ मध्ये मुरगूड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी असताना पत्रकारांसाठी लोक वर्गणीतून ५ लाख रु. खर्चाचे पत्रकार भवन उभारले आहे. त्याचबरोबर वृतपत्रामध्ये बातम्यांच्या माध्यमातून अनेक प्रलंबीत प्रश्नानां त्यानीं वाचा फोडण्याचे कार्य केले आहे .आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून त्यांचे साहित्यीक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.

     पुरस्कार वितरण समारंभावेळी संमेलनाध्यक्ष सुभाष बागल, स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, सुप्रसिद्ध कृषी तज्ञ बुधाजीराव पानसरे, विलास पाटील, ॲड. अजित सिह राणे, नगरसेविका संध्या देवरे, आचार्य शंकर अंदानी, शालिग्राम भिरुड, फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर, नंदकुमार राऊत, प्रा. सुमती पवार, डॉ. परशूराम खुडे, डॉ. एस. एन. मराठे, प्रा. रमाकांत जाधव, प्रा. वा. ना. आंधळे, माजी नगरसेवक देवरे, वैभव रौंदळ यांच्यासह महाराष्ट्र गोवा कर्नाटक सीमा भाग आदी परिसरातून साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!