मुरगूड आदमापूर ते ठाणे लालपरी बससेवेचा शुभारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) : गारगोटी आगाराने मुरगूड आदमापुर ते ठाणे अशी बस सेवा दिनांक २२ एप्रिल २०२६ पासून सुरू केलेली आहे. ही बस गारगोटी होऊन सकाळी आठ वाजता सुटेल व मुरगूडला आलेनंतर मुरगूड हून ८ .४५ ला ही बस सुटेल व आदमापूर, बिद्री, कोल्हापूर, कराड, सातारा, पनवेल, वाशी, ऐरोली मार्गे
ठाणे येथील वंदना बस स्थानकावर ते ५.४० ला पोहचेल.

Advertisements

मुरगूड येथे या बसचे पूजन स्नेहा काशीद (वाहक) राधानगऱी व दिव्यांग बस प्रवासी आदेश कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्रीफळ व पुष्पहार अर्पण झाल्यावर बस ठाणेकडे मार्गस्थ करण्यात आली. ठाण्याहून ही बस सकाळी ८ वाजता निघेल व मुरगूड येथे १७.५५ ला पोहचेल. बसच्या पूजन व उदघाट्न प्रसंगी सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी पांडुरंग पाटील होते.

Advertisements

या बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी वाहतूक नियंत्रक संजय भोसले व सौ.सुनीता जाधव (गळपाशे), बाळासो परीट. याशिवाय स्थानकावरील सर्व चालक, वाहक, कर्मचाऱी, प्रवासी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. या बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा गारगोटी आगार प्रमुख अनिकेत चौगुले यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!