लक्ष्मीनारायण संस्थेकडून सभासदांना १५% लाभांश जाहीर; ३१ लाख १४ हजारांचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर): येथील हिरकमहोत्सवी ‘श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थे’च्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांसाठी १५ टक्के लाभांश (लाभांशापोटी ३१ लाख १४ हजार रुपये) देण्याची घोषणा संस्थेचे उपसभापती श्री दत्तात्रय कांबळे यांनी केली. सन २०२५/२६ या आर्थिक वर्षात संस्थेने ३ कोटी ३९ लाख ०२ हजार रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा मिळवला आहे.

Advertisements

वार्षिक सभेत संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री दाफळे सर यांनी प्रगतीचा अहवाल मांडताना सांगितले की, संस्थेने गेल्या अहवाल सालात ७५४ कोटी ५६ लाखांचा विक्रमी व्यवसाय केला. यामध्ये १५३ कोटी ४८ लाखांच्या ठेवींच्या आधारे १२० कोटी ६३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले (ज्यात ७८ कोटी ४१ लाखांचे कर्ज सोनेतारणावर आहे).

Advertisements

चालू वर्षात ४० लाख रुपयांच्या संस्था महोत्सव निधीची तरतूद केली असून ३१ मार्च २०२७ अखेर १८० कोटी ठेवी, १३५ कोटी कर्जे व ४ कोटी नफा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, संस्थेचे ऑडिटर श्री. एस. जे. देशपांडे यांनी संस्थेला ‘अ’ वर्ग मिळाल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवत्ताधारक पाल्यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सभेचे आभार संचालक विनय पोतदार यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!