कागल मधून ७५ वर्षीय वृद्ध बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

कागल : कुरुंदवाड येथील एक ७५ वर्षीय वृद्ध व्यक्ती रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात ‘हरवल्याची’ नोंद करण्यात आली असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Advertisements

हरी माणिक सुरवसे (वय ७५, सध्या रा. लक्ष्मीनगर, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर; मूळ रा. पाचखळ, मंगळवेढा, जि. सोलापूर) असे बेपत्ता झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, हरी सुरवसे हे गेल्या काही वर्षांपासून कामाच्या निमित्ताने कुरुंदवाड येथे राहत होते. १२ मे २०२६ रोजी ते त्यांच्या भावाला भेटण्यासाठी कागल येथे आले होते. त्यानंतर १३ मे २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजताच्या सुमारास, ते आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पाचखळ (ता. मंगळवेढा) या मूळ गावी जाण्यासाठी घरातून निघाले. मात्र, ते मूळ गावी पोहोचलेच नाहीत.

दरम्यान, त्यांच्या नातेवाइकांनी सोलापूर आणि इचलकरंजी येथील सर्व परिचितांकडे व नातेवाइकांकडे चौकशी केली, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागलेला नाही. अखेर १४ मे २०२६ रोजी कागल पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Advertisements

शारीरिक वर्णन व पेहराव :
वय: ७५ वर्षे
उंची: ५ फूट ५ इंच
बांधा: मध्यम
रंग: सावळ्या रंगाचा
चेहरा: गोल
पेहराव: अंगात आकाशी रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाची पँट, पायात चप्पल.

संपर्क करण्याचे आवाहन :  जर या वर्णनाची कोणतीही व्यक्ती कोणाला आढळून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास, खालील मोबाईल क्रमांकांवर किंवा कागल पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या नातेवाइकांनी केले आहे.

संपर्क क्रमांक: 7875318896

Leave a Comment

error: Content is protected !!