मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामीण रुग्णालय मुरगूड ता. कागल जि. कोल्हापूर येथे सोमवार दि .१८ / ५ / २०२६ रोजी सकाळी ठिक११ वाजता महाडायलेसिस केंद्राचा उद्धाटन सोहळा मा. ना. हसनसो मुश्रीफ ( मंत्री, वैद्यकिय शिक्षण महाराष्ट्र राज्य ) यांच्या शुभहस्ते व मा . ना . प्रकाश आबिटकर ( सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर ) यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा सपन्न होणार आहे .
मा . लोकसभा सदस्य मा . श्री . संजयदादा . मंडलिक , माजी. आमदार मा. श्री. संजयबाबा घाटगे, शाहू ग्रूपचे अध्यक्ष मा. श्री समरजित घाटगे , जि .प. अध्यक्ष कोल्हापूर शिल्पा खोत यांची प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे .

याच बरोबर मा . सारिका नांदेकर , मा . सुवर्णा पाटील , मुरगूड न . पा . नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील , उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले , सर्व नगरसेवक , रुग्णकल्याण समिती सदस्य , डॉ . दिलीप माने , डॉ .सरीता थोरात , मा . अमरदिप वाकडे , ( तहसिलदार कागल ) , मा . अतिश वळुंज , ( मुख्याधिकारी मुरगूड न . पा . ) , मा . कुलदिप बोगे ( गटविकास अधिकारी कागल ) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
या कार्यक्रम सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुरगूड ग्रामिण रुग्णालय प्रशासनाने केले आहे .