बातमी

मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “जागर मायबोलीचा ” कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त.अग्रणी महाविद्यालय अंतर्गत “जागर मायबोलीचा ” हा बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अर्जुन कुंभार यांच्या हस्ते होणार आहे . प्रमुख गायक रणजित कदम मुरगूड,प्रगती कुंभार -गारगोटी,नीता कोळी -कोल्हापूर , हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक व महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख.अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रो.(डाॅ.) शिवाजी होडगे यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय मुरगूड अंतर्गत बिद्री, निपाणी, कागल, सोळांकूर, भोगावती, गारगोटी, सरवडे, कापशी, राधानगरी या महाविद्यालयातील प्रत्येकी ४ विद्यार्थी १ प्राध्यापक पाठवून सहकार्य करावे.

कार्यक्रम स.११ ते २ या वेळेत होणार असून यासाठी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.शिवाजी होडगे, संयोजक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *