२०२४ मधील मुरगूड नगरपालिकेच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करा – सर्वसाधारण सभेत मागणी

२६ विषयावर सभेमध्ये चर्चा

मुरगूड ( शशी दरेकर ) : २०२४ मध्ये कार्यान्वीत झालेल्या मुरगूडातील सदोष नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करुन ठेकेदाराला नोटीस पाठवण्याची मागणी तसेच हुतात्मा तुकाराम वाचनालया समोर दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा जीवनपट उलगडणारे शिल्प उभारण्यास मुरगूड नगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील सभेच्याअध्यक्षस्थानी होत्या.

Advertisements

उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले मुख्याधिकारी आतिश वाळुंज प्रमुख उपस्थिती होते. विषय सभेमध्ये २६ विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विषय पत्रिकेचे वाचन रणजित निंबाळकर यांनी केले. रस्त्यासाठी खुदाई करण्यात आल्यानंतर नळ पाणीपुरवठ्याच्या अनेक ठिकाणी कमी जास्त जाडीच्या पाईपलाईन दिसून आल्या आहेत याची चौकशी केली का १ शिवाय या योजनेमध्ये अनेक प्रकारचे दोष व तक्रारी असल्याचे विजय राजिगरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Advertisements

चतुर्थ वार्षिक पुनर्मुल्यांकनामध्ये शहरातील संपूर्ण ३८१७ प्रॉपर्टींचे पुनर्मूल्यांकन करण्याऐवजी नव्या इमारतींचेच मोजमाप व्हावे असे नगरसेवक आनील राऊत व दत्तात्रय मंडलिक यांनी सुचवले .

तुकाराम चौक ते राम मंदिर परिसर ३० फूट रुंदीने करून दुतर्फा झाडे लावणे, मुख्य बाजारपेठेत सम – विषम तारखेप्रमाणे पार्किंग करणे, अंबाबाई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे,अंबाबाई मंदिरातील खिडक्यांना जाळी बसवणे, पालिकेतील वाहन विभागाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्याकडे देणे, घंटागाडीसाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करणे, व अन्य ठिकाणच्या सदोष सोलरची चौकशी करणे, साई कॉलनीमध्ये नमो उद्यान उभारणे, घनकचरा प्रकल्प उभारणीच्या कामाला मुदत वाढविणे,हुतात्मा तुकाराम चौकाचे सुशोभीकरण ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सदाशिवराव मंडलिक प्रवेश कमान दुरुस्ती, एसटी स्टँड परिसरात एटीएम वॉटर प्लॅन बसवणे, यासाठी बांधकाम सभापती एस व्ही चौगुले व नगरसेवक रणजीत भारमल यांनी सुचना मांडल्या .

नगरसेवकांचा स्वच्छता अभ्यास दौरा. पाण्याचे टँकर दुरुस्ती अशा विविध विषयांवर पाणी पुरवठा सभापती सत्यजीतसिंह पाटील यांनी सभागृहात चर्चा घडून आली. नगरपालिकेने दिव्यांगांना ५ टक्के अनुदान वाटप केल्याबद्दल दिव्यांग बांधवांतर्फे नगराध्यक्षा सुहासिनी पाटील उपनगराध्यक्ष रेखा मांगले व सि ओ अतिश वंळुज तसेच सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी चर्चेमध्ये गटनेते सुहास खराडे,सुनील रणवरे,राजू आमते,गित़ांजली आंगज, सुजाता पुजारी यांनी ही सुचना मांडल्या. यावेळी नगरसेविका विजया शिंदे, वैशाली गोधडे, सुरेखा लोकरे, निकेलिन बारदेस्कर, संजीवनी कांबळे, संगिता चौगुले नगरसेवक बजरंग सोनुले उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!