निसर्गाकडे चला, निसर्ग भरभरून देतो, निसर्गाला कृतघ्नपणे ओरबडू नका – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) : निसर्गाकडे चला, निसर्ग भरभरून देतो.विद्यार्थ्यानो निसर्गमित्र बना कृतघ्नपणे निसर्गाला ओरबडू नका. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले. पी एम श्री केंद्रशाळा केनवडे ता.कागल येथे “पर्यावरण संवर्धन आपले कर्तव्य.” या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील होते. स्वागत- प्रास्ताविक युवराज पवार यांनी तर, आभार प्रदीप जाधव यांनी मानले.

Advertisements

वृक्षमित्र सुर्यवंशी पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या शालेयजीवना पासूनच स्वतःमध्ये निसर्गप्रेम जोपासावे. शाळांनी फटाकेमुक्त दिवाळी अभियान, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, वृक्षरक्षाबंधन, बीज संकलन,संकलित बियांची हवाई पेरणी, शाळेतून रोपवाटिका निर्मिती, रोपांचे वाटप व वृक्षारोपण यासारखे कृतिशील कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून राबवावेत. शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांच्या मध्ये वृक्ष,पक्षी,प्राणी निसर्ग यांचे विषयी भूतदया  निर्माण करणे गरजेचे आहे.

Advertisements

  या कार्यक्रम प्रसंगी वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी लिखित ‘झाडमाया कवितांची हिरवाई’ या कवितासंग्रहाच्या प्रती व वृक्षांची रोपे वृक्षमित्र सुर्यवंशी यांचे कडून शाळेस भेट देण्यात आली. यावेळी श्रीमती शरावती कोरवी, कृष्णात पाटील, श्रीमती श्रावणी देवेकर, श्रीमती वनिता पाटील, श्री रामकृष्ण कांबळे, श्री प्रतीक शिंगे, आदी शिक्षक वृंदासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!