डॉ. कलाम यांच्यामुळे भारताची विश्वात प्रतिष्ठा – माजी प्राचार्य पी. डी. मगदूम

ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम जयंती साजरी

मुरगूड (शशी दरेकर) : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे भारताची विश्वात प्रतिष्ठा वाढली . राजकारणातील आदर्श राष्ट्रपती म्हणून त्यांनी प्रत्येक कृतीमध्ये निस्वार्थी भावनेने देशाच्या उद्धाराचा प्रयत्न केला. असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य पी. डी. मगदूम यांनी व्यक्त केले.

Advertisements

          आजच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना शिवराजचे माजी उपप्राचार्य रवींद्र शिंदे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनपट उलगडला. ते म्हणाले, सर्वोच्च स्थानी असूनही त्यांची साधी राहणी समाजातील सर्व घटकांपुढे आदर्शवत असून त्यांचे मौलिक विचार भरकटलेल्या समाजाला स्थिरस्थावर करणारे आहेत.

Advertisements

विशेषतः अग्निपंख या त्यांच्या जीवनचरित्रातील अनेक घटनांचे वर्णन करताना शिंदे यांनी कलाम यांचे कुटुंबीय, त्यांना मिळालेली साथ, कलाम यांचा शैक्षणिक प्रवास, विज्ञान क्षेत्रातील त्यांची कामगिरी, राष्ट्रपती पदावरील त्यांनी केलेले काम, निवृत्तीनंतर तरुणांना केलेले उद्बोधन, लेखन अशी संग्रह्य माहिती उपस्थितांना दिली.

            शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श राष्ट्रीय पत्रकार पुरस्काराबद्दल रवींद्र शिंदे यांचा तर सामाजिक कार्याबद्दल प्रवीण सूर्यवंशी यांचा तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या प्रशिक्षक महादेव कानकेकर यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महादेव कानकेकर आणि प्रवीण सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले .

Advertisements

            यावेळी सदाशिव एकल, दादू बरकाळे, तानाजी डवरी, शिरसेकर, सुरेश दरेकर, के एल पाटील, सिकंदर जमादार, प्रदिप वर्णे, सदाशिव यादव, रामचंद्र रनवरे, तुकाराम भारमल, गणपती शिरसेकर, पांडुरंग मेंडके, बाबूराव कापसे , रणजितसिंह सासणे यांच्या सह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

स्वागत जयवंत हावळ यांनी, प्रास्ताविक अशोक डवरी यांनी, सूत्रसंचालन एम टी सामंत यांनी तर आभार सखाराम सावर्डेकर यांनी मानले.

.

Leave a Comment

error: Content is protected !!