सरपंच सौ. शीतल अमोल नवाळे सह ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतला पुढाकार

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील गावच्या कमानी नजीक मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले होते. सदर कचऱ्यामुळे गावात प्रवेश करताच समोर मोठ्या प्रमाणवर कचरा निदर्शनास येत होता. त्यामुळे ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द कडून जेसीबीच्या सहाय्याने हा कचरा हलविण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कागल तालुक्या पासून तीन किलोमीटर अंतरावर पहिलेच गाव लागते.गावात प्रवेश करताच कमानी पासून 100 मीटर अंतरावर कचऱ्याचे मोठे साम्राज्य निर्माण झाले होते. कोणताही व्यक्ती गावात प्रवेश करताच कचऱ्यानेच त्याचे स्वागत होत होते. याबाबत अनेक नागरिकांनी तोंडी तक्रार ग्रामपंचायतकडे केली होती.

Advertisements

यावर सरपंच सौ. शीतल अमोल नवाळे सह ग्रामपंचायत सदस्य यांनी मिळून गावातील सर्वच कचरा स्वच्छ करण्याचा निर्णय घेत गावातील अनेक ठिकाणचा कचरा जेसीबीच्या सहाय्याने उचलून स्वच्छ केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

गावातील अनेक ठिकाणी  तुंबलेल्या गटारी, कचरा स्वच्छ केल्याने नागरिकामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

2 thoughts on “पिंपळगाव खुर्द येथे ग्रामपंचायत कडून स्वच्छता मोहिम”
  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!