केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहाय्यक फौजदार श्रीपती व्हरांबळे यांचे हदयविकाराने निधन

मुरगूड (शशी दरेकर) : छत्तीसगड केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहाय्यक फौजदार श्रीपती ज्ञानदेव व्हरांबळे (रा. हळदी ता. कागल)  (वय ५७) यांचे बुधवारी पहाटे हदयविकाराने निधन झाले.

Advertisements

         बुधवारी पहाटे सेवेत कार्यरत असतानाच श्रीपती व्हरांबळे यांना हदयविकाराचा तीव्र धक्का बसला व त्यांचा झोपेतच मृत्यू  झाला . ते २१८ बटालियन छत्तीसगड येथे कार्यरत होते. त्यांच्या निधनाने हळदी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

           त्यांचा मुलगा विश्वंबर हा गुजरात येथे सीमा सुरक्षा दलात  आहे त्यांचा विवाह २६ एप्रिल रोजी उरकून श्रीपती व्हरांबळे हे हळदीहून छत्तीसगडला गेले होते. त्यांच्या मागे दोन मुले, चार भाऊ व तीन बहिणी आहेत.

      सहाय्यक फौजदार श्रीपती  व्हरांबळे यांच्या मृतदेहावर शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर हळदी गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!