सानिका स्पोर्ट्स मार्फत हर घर तिरंगा मोहीम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स मार्फत हर घर तिरंगा मोहीम राबविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ही मोहीम सानिका स्पोर्टने स्वखर्चाने  ही मोहीम राबविली आहे.   प्रत्येक मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा मूळ हेतू तर आहेच शिवाय विविधतेत एकता ही आपल्या देशाची सामाजिक बांधणी आहे तीही … Read more

Advertisements

कागलच्या धर्तीवर कृत्रिम धबधबा उपक्रम राज्यात राबवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कागल पाझर तलाव परिसराला अधिकाधिक पर्यटक भेट देतील कागलच्या पाझर तलावातील संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा, बोटिंग क्लबचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण मटण, चिकन व फिश मार्केटच्या नवीन इमारतीचेही लोकार्पण संपन्न कोल्हापूर, दि.11 (जिमाका) : कागल मधील निसर्ग संपन्न पाझर तलाव परिसरात तयार करण्यात आलेला कृत्रिम धबधबा, बोटींग, म्युझिक फाऊंटन, व्हॉईस फाऊंटन हा अत्यंत … Read more

नाट्यगृह पूर्वी होतं तसं बनवा, सरकार वाटेल ती मदत करायला तयार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजितदादा यांनी थेट केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली. यावेळी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना असल्याचं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. अजित … Read more

लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाघापूरात नागपंचमी उत्साहात  साजरी

मुरगुड (शशी दरेकर) : महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली, दरम्यान पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या पत्नी सौ विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते महापूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने आबिटकर यांचा सपत्नीक सत्कार … Read more

मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ऑगष्ट रोजी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल १८ कोटी८९ लाख ठेवी व१६ लाख५७ हजार नफा मिळवणारी व मुख्य शाखेसह मुदाळ तिट्टा येथिल शाखा कार्यरत असणारी रौप्यमहोत्सवी  श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ११ / ८ / २०२४ इ. रोजी  दुपारी ठिक१२ वाजून ३० मिनिटानीं श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या  मुख्यशाखा … Read more

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयात क्रांतीदिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल हुतात्मा तुकाराम वाचनालयात शुकवार दि .९ / ८ / २४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता क्रांती दिन साजरा करण्यात आला.प्रथम क्रांतीकारांच्या फोटोंचे पूजन सेवानिवृत्त पोलिस मा. श्री .निवासराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले , किरण गवाणकर … Read more

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी रोम या देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य रसिकांसाठी हे नाट्यगृह बांधले होते. ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रात्री मी श्री. … Read more

मतदान नोंदणी व सर्व शासकीय दाखल्यांचा तरुणांनी लाभ घ्यावा – नायब तहसीलदार  सूर्यकांत कापडे

मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राजकीय प्रक्रियेतील सहभागासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे यांनी केले ते पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे “युवा संवाद” कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.         यावेळी नायब तहसीलदार महेश देशमुख यांनी सर्व दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली. महसूल … Read more

मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष केबिनमध्ये नमाज पठणाचा प्रकार

मुरगूडमध्ये तणाव मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष केबिनमध्ये दोघाजणांचा नमाज पठणाचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यामुळे हजारो तरुणांचा संतप्त जमाव मुरगूड नगरपालिकेजवळ जमल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. अब्दुल गणी सलाउद्दीन बागवान (वय • ३७) आणि अहमद अमान उल्ला आजखी (वय ३५, रा निपाणी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. प्रभारी … Read more

मुरगुडमध्ये अज्ञाताकडून दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न

मुरगूड  ( शशी दरेकर ) : मुरगुड शहरा नजीकच्या शाहूनगर वसाहतीतून पाणंद मार्गाने शाळेकडे जात असलेल्या दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा दोघा अज्ञातांनी प्रयत्न केला. मुलींनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यानंतर अज्ञातांनी तेथून पळ काढला. ही घटना मंगळवारी घडली. पोलीस अज्ञातांच शोध घेत आहेत. शाहूनगर वसाहतीमधून दोघी शाळकरी मुली मंगळवारी १०.३० वा. च्या सुमारास शाळेला पाणंद रस्त्याने … Read more

error: Content is protected !!