अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

कागल (प्रतिनिधी) : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला रियाज इस्माईल नाईकवाडे वय वर्षे 38 राहणार- मुळगाव, कोगनोळी ,तालुका निपाणी सध्या राहणार संत रोहिदास चौक कागल ,असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.               अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांच्या माहितीनुसार मयत … Read more

Advertisements

कागल मध्ये १४ लाखाचा दरोडा

कागल (विक्रांत कोरे) : सोन्या -चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे १३ लाख ८० हजार रुपयांचा दरोडा अज्ञात चोरट्यानी कागल येथे घातला .हा चोरीचा प्रकार येथील मुजावर गल्लीतील बाबासाहेब अहमद काझी यांच्या घरी रविवारी रात्री घडला. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.               बाबासाहेब काझी , घर नंबर 305 ,मुजावर गल्ली, कागल, सध्या … Read more

विवाहित महिलेने केली आत्महत्या

कागल (प्रतिनिधी) : सासू-सासरा व पती यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार मौजे सांगाव तालुका कागल येथे सोमवारी दुपारी घडला. कागल पोलीस ठाण्यात सासु, सासरा व पती यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.         सौ शुभांगी सयाजी माळी वय वर्ष 26, राहणार मौजे सांगाव, तालुका कागल, असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. … Read more

सुरुपली, सोनगे येथे दोन बंद घराची  कुलूपे  तोडून चोऱ्या, लाखोंचा मुद्देमाल चोरीस

सुरुपलीत सलग तीन दिवस तीन चोऱ्या, परिसारत घबराट मुरगूड ( शशी दरेकर) : सुरुपली व सोनगे येथे बंद घराची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला आहे सुरुपली येथे  एल इ डी टीव्ही,चांदीच्या अंगठ्या व रोख रक्कम असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला असून सोनगे येथील घर मालक बाहेर गावी गेले असल्याने कितीचा … Read more

लिंगनूर दुमाला उपसरपंच पदी वैशाली कांबळे यांची बिनविरोध निवड

कागल (विक्रांत कोरे) :  लिंगनूर दुमाला तालुका कागल ग्रामपंचायत नामदार हसन मुसळे संजय बाबा घाटगे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या सत्ता असून रोटेशन पद्धतीने ठरल्याप्रमाणे सौ उमेश महेश बारड उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदी असं मुश्रीफ गटाच्या सौ वैशाली सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच श्रीमती … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथे नुकतेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी द्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत महाविद्यालयात ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, असोसिएट डीटीपी,  कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह व क्लाऊड एप्लीकेशन डेव्हलपर असे चार कोर्स सुरू करण्यात … Read more

मुलीवरील लैंगिक अत्याचार रोखता येतील. कायदे सक्षम आहेत फक्त जागृती हवी – ॲड . राणाप्रतापसिंह सासने

मुरगूड ( शशी दरेकर ) – देशात मुली व महीलां वरील लैंगिक अत्याचार निश्चित रोखता येतील.त्यासाठीचे कायदे एकदम सशक्त व सक्षम आहेत.फक्त त्यांच्या मध्ये जागृति करण्याची गरज आहे.     अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे.कोलकत्या सारखा एखादा गंभीर प्रकार घडला तर देश पेटून उठतो हे आपण पाहिले आहे.लैंगिक अत्याचार म्हणजे विकृत स्वरूपाचा गुन्हा असतो.गुन्हेगाराला कसलाही धर्म नसतो.त्याला … Read more

समाजशास्त्र समजावून घेवूया भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात “समाजशास्त्र समजावून घेवूया ” या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले.        मंडलिक महाविद्यालयात समाजशास्त्र आकलन व उपयोगिता असा आशय असलेले समाजशास्त्र समजावून घेवूया भित्तीपत्रिका तयार करण्यात आली आहे त्याचे प्रकाशन पत्रकार प्रा. सुनिल डेळेकर यांच्याहस्ते करण्यात आले. नॅक समन्वयिका प्रा. सौ माणिक पाटील प्रमुख … Read more

पुस्तकातील ज्ञान जो व्यवहारात आणतो तो इंजिनिअर.! – ह.भ.प. सचिनदादा पवार

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांना समोर ठेऊन आदर्श अभियंता बना..! श्री.आनंदराव आबिटकर इंजिनिअरींग कॉलेजच्या वेलकम डे प्रसंगी ह.भ.प. सचिनदादा पवार यांचे प्रतिपादन गारगोटी(जोतिराम पोवार) : पाल ता. भुदरगड येथील या निसर्गरम्य व सुसज्ज कॉलेजमध्ये यावेळी बोलताना सचिनदादा म्हणाले, इंजिनिअरींगला प्रवेश म्हणजेअर्थ एका अर्थाने सेवेची देखील संधी असते.त्यामुळे आपण अन्यत्र लक्ष विचलित न होता चांगल्या  गुणांनी हे … Read more

सुनीता गळपाशे ठरल्या पैठणीच्या मानकरी

मुरगूड च्या युथ सर्कलचे कार्य कौतुकास्पद – सुहासिनीदेवी पाटील सुनिता गळपाशे ठरल्या पैठणीच्या मानकरी मुरगूड  (शशी दरेकर) : मुरगूड येथिल युथ सर्कलच्या वतीने गेले पन्नास वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करत आहे, त्यातच महिलांची, जेष्ठांची व तरुणांची एकजुट पाहून मला खरोखरच अभिमान वाटतो. या मंडळांने केलेले कार्य हे समाजाभिमुख व कौतुकास्पद … Read more

error: Content is protected !!