गोकुळ शिरगाव पोलिसांची यशस्वी कारवाई: ट्रक टायर चोरीचा गुन्हा उघडकीस

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अशोक लेलँड ट्रकच्या टायर चोरीचा गुन्हा काही तासांतच उघडकीस आणला आहे. पोलिसांनी सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे चोरी केलेले टायर जप्त केले असून दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. २५ जानेवारी २०२५ रोजी … Read more

आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव गणित दिन उत्साहात साजरा

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५ आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,गोकुळ शिरगाव या ठिकाणी “गणित दिन” उत्साहात  साजरा करण्यात आला. गणित दिन २०२४अंतर्गत मराठी विज्ञान परिषद,कोल्हापूर विभागामार्फत करवीर तालुक्यातील विविध शाळांतील गणित शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व गणित सोपं करून कसं शिकवावे याचे मार्गदर्शन दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी आयोजित … Read more

कागलच्या गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिराने छत्रपती चषक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला

कागल : कागल शहरात घेण्यात आलेल्या छत्रपती चषक प्राथमिक शालेय हॉलीबॉल स्पर्धेत नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिराने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत शहर व ग्रामीण विभागात नगरपरिषदेच्या शाळांनीच प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून कागल शहराचे नाव उंचावले आहे. या यशामागे मुख्याधिकारी श्री अजय पाटणकर साहेबांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. … Read more

उजळाईवाडी येथे अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त, दोघांना अटक

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजळाईवाडी येथे अवैध दारूभट्टी चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई काल (दि. २९ जानेवारी २०२५) सायंकाळी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १) महीपाल रामसिंग मेतल (वय ६०) आणि २) सतिश जनार्दन घुमाने (वय ४२) हे दोघे कंजारभाट वसाहत, उजळाईवाडी येथे अवैध दारूभट्टी … Read more

मुरगूडच्या मुलींना महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीत पाच सुवर्ण पदके

मुरगूड ( शशी दरेकर ) : देवळी ,जिल्हा वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती (SAI)संकुल च्या मुलींनी पाच सुवर्ण,एक रौप्य व तीन कास्य पदकांची कमाई केली.     सुवर्ण पदके याप्रमाणे १.नंदिनी बाजीराव साळोखे 50 किलो,२.स्वाती संजय शिंदे 53 किलो,३. तन्वी गुंडेश मगदूम 57 किलो,४. शिवानी बिरु मेटकर … Read more

मुरगूडच्या श्री आत्मरूप गणेश मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील नवमहाराष्ट्र मंडळ प्रणित भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व गणेश जयंतीनिमित्य व” श्रीआत्मरूप गणेश मंदिराच्या २९ व्या वर्धापनदिनानित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . शुक्रवार दि .३१ / १ / २०२५ रोजी वैभव लक्ष्मी कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे . यावेळी प्रत्येक रक्तदात्यानां नवमहाराष्ट्र मंडळामार्फत गिप्ट … Read more

कागलमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा

कागल : कागल शहरात ‘हेल्थ फॉर कागल’ या उपक्रमाअंतर्गत एका भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये १४ वर्षांवरील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात.  गैबी चौकातून दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. ५ किलोमीटरचा मार्ग असून तो शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जाईल. मार्ग: गैबी चौक, मेन रोड, एस टी स्टँड … Read more

कागल शहरात भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव

कागल : स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत कागल शहरात लवकरच भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.  शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या महोत्सवात चित्रकला शिक्षक, ललित चित्रकला, आर्ट डिप्लोमा/एटीडी धारक, भिंतीचित्र स्पर्धेत विजेते, कला/चित्रकला दुकानदार (पुरावा आवश्यक) आणि रेखाचित्र मास्टर (ATD) सहभागी होऊ शकतात. … Read more

अझरुद्दीन ताशिलदार यांना समाजरत्न पुरस्कार

कागल (सलीम शेख) : महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाने अझरुद्दीन ताशिलदार यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. समाजातील विविध घटकांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असलेले ताशिलदार यांचे कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी ७६ दिवस कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सर्व समाजातील शेकडो गरजू,गरीब, अपंग, पेशंट व अनाथांना गरजेच्या … Read more

गोकुळ शिरगाव येथे कोल्हापूर अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

गोकुळ शिरगाव  (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथून जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गावर कोंडस्कर पंपा समोर एका ट्रकला आग लागली. ही घटना पहाटे साडेचार च्या दरम्यान घडली. या घटनेत गारगोटी वरून कोल्हापूरकडे लाकडी चिवाट्या घेऊन जाणारा ट्रक क्रमांक(एमएच 09 क्यू 6268) जळाला. याबाबत अधिक माहिती अशी की, गारगोटी वरून हा ट्रक लाकडी सामग्री घेऊन कोल्हापूर येथे … Read more

error: Content is protected !!