बस्तवडे तालुका कागल येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

मूरगुड(शशी दरेकर): बस्तवडे ता . कागल येथे ६८वा धम्मचक्र प्रवर्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस विहार व परिसराची स्वच्छता करून लहान मुलानीआकर्षक रांगोळी काढली होती.तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस फुले वाहण्यात आली. व सामुदायिकपणे त्रिशरण पंचशील‌ घेण्यात आले . यावेळी गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून ६८वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व थोडक्यात पटवून दिले.

Advertisements

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान बांधवांनी भीम गीते गायीली. यावेळी अक्षता कांबळे , प्राजक्ता कांबळे , वृषाली कांबळे, क्रांती कांबळे, अरविका माने, मथुरा कांबळे , संस्कृती कांबळे, खुशी कांबळे, संगीता कांबळे , श्रेया कांबळे , गणेश कांबळे , शौर्य कांबळे , सरिता कांबळे , रुद्राज कांबळे व रणवीर खोडे व अभिजीत कांबळे इत्यादी सह नागरीक हजर होते. शेवटी सर्वांना सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!