नवीद मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय: गोकुळच्या अध्यक्ष साठी असणारी महागडी गाडी विकणार

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. अध्यक्षा साठी असलेली महागडी अधिकृत गाडी वापरण्यास त्यांनी नकार दिला असून, ती गाडी निविदा काढून विकण्याचा निर्णय त्यांच्या पहिल्याच मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. नवीद मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच, … Read more

संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा! सारथीची प्रलंबित शिष्यवृत्ती अखेर खात्यात जमा

कोल्हापूर : सारथी संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर येथील सारथी उपकेंद्राला 12 जून 2025 रोजी शासनाकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेला निधी प्राप्त झाला असून, त्यामधून 203 विद्यार्थ्यांना एकूण ₹4 कोटी 13 लाख 47 हजार 144 रुपयांचे वितरण … Read more

अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात; २३० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा घटनाक्रम अहमदाबाद : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविकसाठी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे बोइंग ७८७ ड्रीमलाइनर विमान आज सकाळी भीषण अपघाताला बळी पडले. या दुर्घटनेत २३० हून अधिक प्रवासी आणि १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. १९८८ च्या भीषण अहमदाबाद विमान अपघाताच्या आठवणी ताज्या … Read more

पैशाचे पाकीट ज्येष्ठ नागरिकाला वडाप वाहतूकदाराने केले प्रामाणिकपणे परत

मुरगूड ( शशी दरेकर ): यमगे ता. कागल येथील वडाप वाहतूक व्यावसायिक सुधाकर महादेव हुल्ले यांनी आदमापुर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ नरहरी तळेकर वय ८९ रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा यांना त्यांचे गहाळ झालेले पाकीट प्रामाणिकपणे परत दिले.         काल रात्री ७ वा. देवदर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ तळेकर यांना  मुधाळ तिट्ट्यावरून आदमापूर येथे वडाप व्यावसायिक … Read more

जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी – पाटील यांनी घेतले १० टीबी पेशंट दत्तक

मुरगूड ( शशी दरेकर ) : मा. जिल्हाधिकारी,कोल्हापूर श्री.अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, तालुका आरोग्य अधिकारी, कागल डॉ.फारूक देसाई यांनी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत  “निक्षय मित्र” होऊन  क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करणेबाबत आवाहन केले आहे, या आवाहनास प्रतिसाद म्हणून मुरगूड येथिल श्री. जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी यांनी संमती दिलेल्या १०  क्षयरुग्णांना … Read more

कागलमध्ये वटपौर्णिमा उत्साहात; गजऱ्यांची मागणी वाढली!

कागल : कागल शहर आणि परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. वडाच्या झाडाजवळ महिलांची पूजेसाठी गर्दी झाली होती. वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांकडून मोगऱ्याच्या गजऱ्यांना मोठी मागणी होती. पारंपरिक पेहरावात सौंदर्य वाढवण्यासाठी गजऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांची विक्री लक्षणीय वाढली. मागणी वाढल्याने गजऱ्यांच्या दरातही तीन ते पाच पट वाढ झाली, तरीही ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने गजरे … Read more

मुरगूडच्या ओंकार पोतदार यांना राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न  पुरस्कार जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : गुरूवर्य सेवा प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुरूवर्य पुरस्कारासाची घोषणा  नुकतीच करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तिंना हा पुरस्कार जाहिर करण्यात येतो. यावर्षी राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न पुरस्कार मुरगुड ता. कागल येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ओंकार पोतदार याना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंढरपूर, जयसिंगपूर, कोल्हापूर, … Read more

अवकाळीच्या तडाख्याने भाजीपाल्याचे दर भडकले

फळभाज्या ८० ते ९० रुपये किलो कागल (सलीम शेख ) : कागल आठवडी बाजारात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार धक्क्यामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक लक्षणीयरीत्या घटली असून, सलग दुसऱ्या आठवड्यात भाजीपाल्याचे दर तेजीत राहिले आहेत. टोमॅटो वगळता इतर प्रमुख फळभाज्यांचे दर ७० ते ९० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. मे महिन्यात … Read more

मुरगूड येथे शिवभक्त यांच्यातर्फे वृक्षारोपण

परिसरात ५०० झाले लावण्याचा संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील शिवभक्त यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षीही वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला यावेळी मुरगूड येथील पोलिस स्टेशन येथे मुरगूड चे एपीआय शिवाजी करे, मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवगड अध्यात्मिक संस्था, सरपिराजीराव तलाव … Read more

मुरगूड येथे ठिकठिकाणी सुवासिनींनी केली वटसावित्रीची पूजा

मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्येष्ठ मासातील पौर्णिमा.हा दिवस वट पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.या दिवशी सुवासिनी वटवृक्षाची मनोभावे पूजा  करून पतीला आरोग्य दायक दीर्घायुष लाभावे अशी प्रार्थना करतात. पौराणिक संदर्भानुसार सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण पुन्हा मिळावेत म्हणून यमदेवाकडे मागणी केली होती.त्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून साधना केली होती.प्रसन्न होऊन यम देवांनी सत्यवानाचे प्राण … Read more

error: Content is protected !!