विशाल पाटीलच्या जाण्याने एक जिंदादिल व हरहुन्नरी कार्यकर्ता गमावला – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलमध्ये शोकसभेत मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली कागल : कागल नगरपालिकेचे नगरसेवक विशाल पाटील हे सामाजिक प्रश्नांची जाण असलेले धडाडीचे युवा नेतृत्व होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे या शहराने एक जिंदादिल हरहुन्नरी कार्यकर्ता गमावला आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या जाण्याने पाटील कुटुंबियांसह आम्ही सर्वजणच दुःखात आहोत असेही ते पुढे … Read more

Advertisements

कागल महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार

कागल(कॄष्णात कोरे) : पूणा – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सर्कल येथे चालू स्थितीतील ट्रकला पाठीमागून अचानक आग लागली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून तो ट्रक सेवा रस्त्यावर घेतला आणि त्याने ट्रकमधून उडी मारली. ट्रकमध्ये असलेले नायलॉन धागा ऑटो बीम जळून खाक झाले. यामध्ये ट्रकही बेचिराख झाला. या आगीत लाखोंचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी अकरा … Read more

चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ

शेंडूर येथे सव्वा चार कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन व्हनाळी : सागर लोहार कल्याणकारी मंडळे कढून कामगारांची नोंदणी करून चार कोटी कामगारांच्या सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडूर ता. कागल येथे सव्वा चार कोटी … Read more

मुरगूडमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्य घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार

शिवप्रेमी धोंडीराम परीट यांचा आगळावेगळा उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड बाजारपेठ येथे शिवप्रेमींच्या वतीने दि, १९ फ्रेबुवारी _ २०२२ रोजी सकाळी ठिक१o वाजता ” मोलकरीन महिलांचा सत्कार ” करण्यात येणार आहे. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मा .सौ. अक्षता नितिकेश पाटील यांच्या शुभहस्ते होईल. त्यानंतर ” मोलकरीन महिलांचा सत्कार समारंभ होईल, मुरगूड … Read more

कागल तालुका शैक्षणिक विद्यापीठ करा – डाॕ. जी. बी. कमळकर

कागल : कागल तालुका शैक्षणिक विद्यापीठ ओळखण्यासाठी शिष्यवृत्तीसह सर्व स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात अव्वल आणावा. यासाठी शिक्षकांनी नियोजनबध्द व जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन डाॕ.जी.बी.कमळकर यांनी केले.श्री.कमळकर पुढे म्हणाले करिअरच्या अनेकविध वाटा खुल्या झाल्या आहेत.यामध्ये शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षेचे आवाहन पेलत प्रशासकीय सेवेत जाता येते.मात्र यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हीच बाब ओळखून आपल्या अनेकविध कार्यातून … Read more

म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत : अंबरिषसिंह घाटगे

मळगे खुर्द येथे गोकुळ मार्फत दूध उत्पादक मार्गदर्शन कार्यक्रम साके (सागर लोहार) : गोकुळ दूध संघाने दैनंदिन २० लाख लिटरचे लक्ष ठेवले आहे. मुंबईच्या बाजारपेठेत गोकुळ उत्पादित म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे. त्यामुळे कागल तालुक्यातून दूध संस्था व उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त म्हैस दूध उत्पादन घेवून दूध उत्पादकांनी घेऊन गोकुळच्या म्हैस दूध वाढीचे उद्दिष्ट पूर्ण … Read more

कागल येथील नगरसेवक विशाल पाटील- मळगेकर यांचे आकस्‍मिक निधन

कागल : कागल नगरपालिकेचे तरुण नगरसेवक व राजे विक्रम सिंह घाडगे को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विशाल नामदेवराव पाटील मळगेकर वय 35 यांचे आकस्मिक निधन झाले आहे. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उलट्या सुरू झाल्या होत्या. त्यादरम्यान उपचाराला नेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. कागल शहर व परिसरात शोककळा पसरली आहे विशाल पाटील … Read more

मुरगूडमधील सूर्यवंशी कॉलनीत बंद बंगला फोडला

सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथे पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या सुर्यवंशी कॉलनीतील सेवानिवृत प्रिन्सिपॉल मिलिंद गोपाळ जोशी यांच्या बंद बंगाल्याचा कडी -कोयंडा तोडून चोरटयानी दोन लाखांचा ऐवज लंपास केला. शहरात काही दिवसापासून अशा बंद घरात चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे नागरीकात … Read more

दुग्ध व्यवसायात बेलवळे अग्रेसर : अंबरिषसिंह घाटगे

बेलवळे बुद्रुक येथे गोकुळ चा दुध उत्पादक शेतकरी मेळावा व्हनाळी(वार्ताहर): बेलवळे बुद्रुक येथील दुध उत्पादक हे नेहमीच उत्तम प्रतीचे दूध गोकुळ दुध सघाकडे पाठवत आहे. त्याकरिता सर्व दूध उत्पादक, चेअरमन, संचालक, सचिव व कामगार या सर्वांचे फार कष्ट आहेत. दूध उत्पादन क्षमतेत जो बदल झाला, हा बदल अचानक झालेला नाही. त्यासाठी बरेच दिवस लागले आहेत. … Read more

मुरगूडमध्ये शिवप्रेमी तर्फे ” लता मंगेशकर ” यांना श्रध्दांजली

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ( ता. कागल ) येथे बाजारपेठत शिवप्रेमीतर्फे भारतरत्न “लता मंगेशकर “यानां भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शिवप्रेमी श्री. धोंडीराम परीट यानीं आपल्या मनोगतात लतादीदींच्या आठवणीनां उजाळा दिला. अनेक मधूर गाण्यानीं दीदीनी श्रोत्यानां मंत्रमुग्ध केले. अत्यंत सुरेल आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या विश्वविख्यात भारतीय चित्रपट संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ प्रार्श्वगायिका लतादीदींच्या निधनाने … Read more

error: Content is protected !!