बातमी
आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे (धरणाचे) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व जलपूजन
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आजरा तालुक्यातील मौजे आर्दाळ येथे जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन जलसंपदा मंत्री … Read more
भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे
मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महालक्ष्मी सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. इंजूबाई मंदिर हॉल गारगोटी येथे नुकत्याच पार पडलेल्या भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मेळाव्याप्रसंगी त्यांची माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, युवानेते … Read more
सोनाळी व सावर्डे ग्रामस्थ-माहिलांचा वरदच्या आमानुष हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी मागणीसाठी मुरगूड पोलिस स्टेशनवर मोर्चा
भर उन्हात दोन्ही गावातील हजारो लोकांचा ठिय्या अतिरिक्त पोलिस प्रमुख तिरुपती काकडे डी वाय एस पी आर आर पाटील हे दिवसभर मुरगूड पोलिस स्टेशन मध्ये मुरगुड (शशी दरेकर) : “क्रूरकर्मा आरोपीला फाशी द्यावी”, “खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा” अशा घोषणा देत सुमारे दोन हजार महिला पुरुष यांनी मुरगुड शहरात मोर्चा काढत तो पोलीस स्टेशन वर नेला. … Read more
फुटपाथवरील अतिक्रमणावर कागल नगरपरिषदेचा हातोडा
कागल(प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदे कडून एसटी स्टॅन्ड परिसरातील दुकानदारांची फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची जोरदार मोहीम मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आली. यावेळी काही दुकानदारांची फुटपाथवरील बेकायदेशीर बांधकामे व पत्राचे शेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आले आणि त्यातून फुटपाथ मोकळा झाला त्यावेळी दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची गाडी त्या फूटपाथवर पार्क केली जाऊन मुख्य रस्ता मोकळा झाला. नगरपरिषदेचे आरोग्य … Read more
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिळाली राज्य शासनाची इतकी मदत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानी साठी राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी पूरबाधित नागरिकांना आगाऊ मदत देण्यासाठी प्राप्त झाला आहे. तसेच लवकरच प्राप्त होणारा निधी टप्प्या-टप्प्याने बाधितांना वितरीत करण्यात येणार आहे.
मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेचे संचालक ” प्रदिप वेसणेकरांचा ” वाढदिवसानिमित्य सत्कार
मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचीत असणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे माजी व्हा. चेअरमन व जेष्ठ संचालक श्री. प्रदिप दत्तात्रय वेसणेकर यांचा ७३ वा वाढदिवस श्री.व्यापारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेच्या वतीने जेष्ठ संचालक श्री. किशोर पोतदार यांच्या शुभहस्ते अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी संचालक हाजी धोंडिराम मकानदार … Read more
तू. बा. नाईक गुरुजी प्राथमिक विद्यालय येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा
कागल : आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या तू. बा. नाईक गुरुजी प्राथमिक विद्यालय येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहन नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष सदाशिव पिष्टे, संस्थेच्या सचिव श्रीमती सरोजिनी नाईक, संचालिका वैशाली नाईक, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील, माजी मुख्याध्यापिका कांचन हेगडे, शिक्षिका शितल खापरे, … Read more
महाआवासमुळे गोरगरिबांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण…….! – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कागलमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती व घरकुल धारकांना पुरस्कारांचे वितरण… कागल : महाआवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या स्वतःच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसात विविध योजनांमधील तब्बल पाच लाख घरकुले पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. कागल पंचायत समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. … Read more
कोरोणाने सरकारी यंत्रणेवरील विश्वास दृढ : भैया माने
स्वातंत्र्यदिनी कागल येथील डॅाक्टरांचा गौरव; अनंतशांती सामाजिक संस्था व पत्रकार संघटनेचा उपक्रम साके(सागर लोहार) : कोरोनाने जगभर दहशत माजवली ही दहशत इतकी जबरदस्त होती की, कोरोना झाला की माणूस मेला अशी मानसिकता समाजाची तयार होत असताना दुस-या बाजूल याच्यावर कोणतेही ठोस आौषध नसताना देखील सरकारी यंत्रणा आणि कर्मचा-यांनी स्वताचा जीव घहान ठेवून रूग्णांवर यशस्वी उपचार … Read more