आरोग्य बातमी

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय ? मग विचार करा आरोग्याचा

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना काळजी घ्या

कोल्हापूर दि.२६ : अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यावसायिकांचे परवाने व नोंदणी) कायद्यानुसार विविध तळलेले खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी १) तीन वेळा तळण्यासाठी वापरलेल्या खादयतेलाचा पुर्नवापर टाळावा. २) शक्य असल्यास तळण्यासाठी खादयतेलाचा एकदाच वापर करावा.  ३) तळण्यासाठी वापरलेल्या खादयतेलाचा पुर्नवापर करताना ट्रान्सफॅट तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त ३ वेळेसच वापर करावा.  ४) न वापरलेल्या (फ्रेश) तेलामध्ये १५ टक्कयापेक्षा जास्त Total Polar Compounds (TPC) असलेले खाद्यतेल वापरू नये.  ५) तळलेल्या तेलामध्ये २५ टक्कयापेक्षा जास्त Total Polar Compounds (TPC) आढळून आल्यास त्याच्या पुर्नवापर करु नये.  ६)  जे  अन्न व्यावसायिक दररोज ५० लिटर पेक्षा जास्त खादयतेलाचा तळण्यासाठी वापर करतात त्यांनी RUCO (Repurpose used cooked oil ) बाबतचा अभिलेखा जतन करावा. तसेच सदर तेलाची विल्हेवाट लावण्यासाठी सदर वापरलेले तेल हे अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, मान्यता प्राप्त संस्थेकडे द्यावे व त्याबाबतचा अभिलेखा जतन करावा अशी तरतुद आहे.

पुर्नवापर केलेल्या खादयतेलामध्ये  Total Polar Compounds (TPC) तयार होतात. सदर तेल वापरून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने  उच्च रक्तदाब, धमन्यामध्ये चरबी साठून राहणे, विस्मृतीचा आजार, यकृताचा आजार इ. रोगांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. तेलाची योग्य पध्दतीने विल्हेवाट न लावल्यास पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे याबाबतीत अन्न व्यावसायिकांनी सदर वापर केलेले तेल   अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या संस्थेकडेच देणे आवश्यक आहे.

जे अन्न व्यावसायिक वरील नियमांचे पालन करणार नाहीत त्यांचे विरुध्द अन्न सुरक्षा मानदे कायदा, २००६ मधील तरतुदीनुसार कडक कारवाई घेण्यात येत आहे. वापरलेले खाद्यतेल जमा करणाऱ्या मान्यता प्राप्त  संस्थांनी तेल अखाद्य वापरासाठी जसे की, बायोडिझेल, साबण, वंगण इ. चे उत्पादन करण्यासाठी करावा. कोणत्याही परिस्थितीत याचा वापर खादयपदार्थ निर्मिती किंवा भेसळीकरीता वापरू  नये. याबाबतचा आवश्यक तो अभिलेखा त्यांनी जतन करावा. सदर प्रकरणी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास  त्यांचे विरुध्द अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई करण्यात येते

अन्न सुरक्षा  व मानदे  कायद्यातील नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करण्यात यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासना मार्फत सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *