मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी पतसंस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेऊन सर्वांच्या विश्वासास पात्र असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची ५० वी बार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .२४ / ८ / २०२५ रोजी दुपारी ठिक १२ वाजता श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल चिमगांव रोड ) येथे आयोजित करण्यात … Read more

Advertisements

के. डी. पाटील यांची EMSA कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष के.डी. पाटील यांची महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) च्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. पाटील यांच्या कार्याची आणि योगदानाची ही एक मोठी पोचपावती मानली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेज एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र शासन व सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय,  मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने  शिष्यवृत्ती विभाग आयोजित दिनांक १८/८/ २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान उत्साहात संपन्न झाले. सुरुवातीस कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपांना पाणी घालून करण्यात आले. शिष्यवृत्ती विभागाचे प्रा. दादासाहेब सरदेसाई यांनी  सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत  … Read more

मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेत लाभांश वाटप कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता. कागल येथील विश्वसनीय पतसंस्था म्हणून अल्पावधित नावारूपास आलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये २०२४/२५ सालातील लाभांश वाटप सभासदांच्या उपस्थितीत  करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर होते. यावेळी संचालक किशोर पोतदार यानीं जुलै अखेरच्या सांपत्तिक स्थितीची थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले जुलै अखेर संस्थेकडे २३ कोटी … Read more

राजर्षी शाहू सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांकडून जास्त शुल्क आकारल्यास होणार कारवाई

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यात राजर्षी शाहू सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र अशी एकूण ७५ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत नागरिकांना महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले वितरित केले जातात. त्यासाठी शासनाने निर्धारित केलेले सेवा शुल्क घेणे बंधनकारक आहे, मात्र काही केंद्र चालक निर्धारित शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारत … Read more

मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची  सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने पसायदान व संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची  सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात  साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम राज्य शासनाच्या निदर्शना नुसार  नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी  अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. नगरपरिषद कार्यालय , तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये  पसायदानाचे आयोजन करुन प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर  … Read more

कागलमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ‘मतदार जागृती रॅली’

कागल (प्रतिनिधी) : कागल शहरात ‘आम्ही भारतीय लोक’ या संघटनेच्या वतीने निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने होणाऱ्या ‘मतचोरी’ विरोधात एक भव्य ‘मतदार जागृती रॅली’ काढण्यात आली. ही रॅली शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाऊन परत गैबी चौकात तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित … Read more

मुरगूडची गोकुळ अष्टमी – चार पिढ्यांची परंपरा कृष्ण भक्तीचाअखंड वहातोय झरा

मुरगूड ( शशी दरेकर ):   मुरगूड  तालुका कागल येथे विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची चार पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे. काळाच्या ओघात अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंड पणे सुरू आहे.      स्व.विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड सुद्धा होते.आद्य पूजेचा मान असणाऱ्या … Read more

मुरगूड मध्ये विविध ठिकाणी ७९ वा ध्वजारोहण समारंभ संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ अत्यंत दिमाखदारपणे  पार पडला. हुतात्मा तुकाराम चौकातील मुख्य ध्वजारोहण मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला शहरातील  मान्यवर, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक वृंद  त्याच  प्रमाणे अबालवृद्ध  उपस्थित होते. हुतात्मा स्मारकातील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार राणोजी गोधडे, … Read more

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते भाजपाचे भरत पाटील यांचा सत्कार; कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा

प्रतिनिधी – (सलीम शेख): कोल्हापूर : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा ‘भाजपा स्टार्टअप इंडिया’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी भरत पाटील यांनी राज्यपालांना शाल, श्रीफळ आणि महाराणी ताराराणी यांचा पुतळा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या … Read more

error: Content is protected !!