हळदी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

मुरगुड ( शशी दरेकर ) : हळदी (ता. कागल ) येथील रोहित वाकोजी सावरतकर वय वर्षे १८ याचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याचे मुरगूड पोलिस स्टेशन मध्ये नोंदवलेल्या फिर्यादीवरून सांगण्यात आले. पोलिसांतून मिळालेल्या अधिक माहिती वरून हळदी ते कापसी रोडवरील हळदी नावाच्या शेतामध्ये जेसीबी व ट्रॅक्‍टरच्या साह्याने माती काढण्याचे काम सुरू असता ट्रॅक्टर चालक दिगंबर विलास … Read more

Advertisements

राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनास उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या या ग्रंथप्रदर्शनाचे, कोल्हापुरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक किरण गुरव आणि सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल … Read more

नवोदित खेळाडूंनी शिक्षणाबरोबर क्रिडा स्पर्धेकडे लक्ष द्यावे – राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग

मुरगूड ( शशी दरेकर ) : राजकारणातील एकमेकाचे वैर विसरून कुस्तीसाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे पैलवान घडवण्याचा आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पद्के मुरगूडात आणण्याचा या स्नेह मेळाव्यात निर्धार करण्यात आला*अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वस्ताद आनंदा गोधडे तर प्रमूख पाहुणे राष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेतील विजेते आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान राम सारंग होते. सुरुवातीला दिवंगत मल्लांना श्रध्दांजली वाहण्यात … Read more

ओढ्यातील गाळ पालिकेच्या दारात आणून टाकू तसेच भटकी कुत्री खुर्चीला बांधू मनसेचा इशारा

गडहिंग्लज(प्रतिनिधी): गडहिंग्लज शहराचे भौगोलिक क्षेत्र पाहता शहरातील सीमेवर ओढ्यांचे अस्तित्व आहे. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ओढ्यामधून पाणी नागरी वस्तीत घुसून लोकांचे अतोनात नुकसान झाले. त्या दरम्यान मंत्रिमंहोदय व शासकीय अधिकाऱ्यांनी पुरक्षेत्राची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. आज या घटनेला वर्षभर होत आले असून पुन्हा अवकाळी पाऊस तसेच नियमित पावसाळा सुरू होण्याची वेळ … Read more

शेतमाल वितरण व मुल्यसाखळी निर्मिती बाबत कृतीशील नियोजनावर भर द्यावा- एस. भुवनेश्वरी

कोल्हापूर दि.२६ : शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून शेतमाल वितरण व मुल्यसाखळी निर्मिती विषयाबाबत कृतीशील नियोजनाबरोबरच जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व अनुषंगिक क्षेत्रास माहिती तंत्रज्ञानाची जोड देवून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका एस. भुवनेश्वरी यांनी केले.कृषी विभागाच्या वनामती नागपूर या राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका एस.भुवनेश्वरी यांनी … Read more

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय ? मग विचार करा आरोग्याचा

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना काळजी घ्या कोल्हापूर दि.२६ : अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यावसायिकांचे परवाने व नोंदणी) कायद्यानुसार विविध तळलेले खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी १) तीन वेळा तळण्यासाठी वापरलेल्या खादयतेलाचा पुर्नवापर टाळावा. २) शक्य असल्यास तळण्यासाठी खादयतेलाचा एकदाच वापर करावा.  ३) तळण्यासाठी वापरलेल्या खादयतेलाचा पुर्नवापर करताना ट्रान्सफॅट तयार होणे टाळण्यासाठी जास्तीत जास्त ३ वेळेसच … Read more

किरीट सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा: अतुल लोंढे

मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचे उद्योग सोमय्यांनी बंद करावेत मुंबई, दि. २६ एप्रिल : भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या हे राज्यातील शांतता भंग करण्याचे काम करत असून बुनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांनाही बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. नौटंकीबाज सोमय्या हे वारंवार राज्य सरकार, पोलीस व प्रशासनाच्या कामात अडथळे आणून … Read more

बालकांच्या हक्कांची पायमल्ली न होता त्यांना घटनेने दिलेले हक्क द्यावेत- सरपंच पूजा मोरे

पिंपळगाव खुर्द(आण्णाप्पा मगदूम): व्हन्नूर ता.कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर या प्रशालेत ग्रामपंचायत व्हन्नूर यांच्यामार्फत बालसभेचे आयोजन केले होते. या बालसभेत बालकांचे हक्क आणि कर्तव्य, बालविवाह, बालकामगार, १५ व्या वित्त आयोगातून बालकांना मिळणाऱ्या सुविधा, सामाजिक सुरक्षा या सारख्या अनेक विषयांवर चर्चा घडून आली. यावेळी व्हन्नूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा मोरे यांनी बालसभेची संकल्पना मांडली. … Read more

संजयबाबा मुळेच शेतकऱ्यांचे कोटकल्याण : अशोक पाटील

साके येथे संजयबाबा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व्हनाळी (सागर लोहार): साके व्हनाळी, केनवडे, गोरंबे या कोरडवाहू पांढऱ्या पट्ट्यात अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोंगर कपारीवर शेतीला पाणी उपलब्ध करून देऊन या भागाचे नंदनवन केले शिवाय परिसरात हरित क्रांती निर्माण करून शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्याचे कोटकल्याण करण्याचे काम माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले असे प्रतिपादन … Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ कोल्हापूर : वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून 100 ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते. हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला असून … Read more

error: Content is protected !!