विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ
– माजी आमदार संजय घाटगे

मुरगूड ( शशी दरेकर ) -विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर कागल चे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल तसेच बुद्धिमान व कष्टकरी मुलांच्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. असे प्रतिपादन माजी आमदार … Read more

वंदूर येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील वंदूर येथे बिबट्या आढळून आल्याने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतकरी शिवाजी पाटील हे गवत कापण्यासाठी गेले असता झाडावर बसलेला बिबट्या त्यांनी पाहिला. बिबट्याने खाली उडी मारताच या शेतकऱ्याचा थरकाप उडाला. बिबट्याने भुकणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर कुत्र्याला पकडून ऊसात पाळाला. यानंतर शेतकरी आरडाओरडा करत पळत सुटले. … Read more

महिला लोकशाही दिन सोमवारी

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) :  माहे डिसेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजीसकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी.बी.शिर्के यांनी दिली आहे. लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व … Read more

कागल येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक ठार

कागल /प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने भरघाव वेगात जाणाऱ्या अलिशान कारने महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडले. तानाजी शंकरराव बाबर (वय वर्षे ६०, राहणार शाहू कॉलनी, कागल) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयसिंगराव तलाव कमानीसमोर दुपारी एकच्या वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तानाजी बाबर हा महामार्ग ओलांडत कसता कागलहूनकोल्हापूरच्या दिशेने चाललेल्या अलिशान कारने बाबर यांना … Read more

सानिका स्पोर्टस् चे नूतन अध्यक्ष रतन जगताप यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे

खजिनदार सागर सापळे, सचिव निशांत जाधव संपर्कप्रमुख जगदिश चितळे मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील कोल्हापूर जिल्ह्यात नावाजलेले सानिका फाउंडेशन या मंडळाच्या अध्यक्षपदी रतन जगताप तर उपाध्यक्ष पदी नंदकुमार खराडे यांची एक मतांनी निवड झाली. मुरगुड येथील कोल्हापूर जिल्ह्यात डे नाईट क्रिकेट स्पर्धा घेणारे व कागल तालुक्यातील नावाजलेले सानिका फौंडेशनच्या मंडळाच्या … Read more

निढोरी येथील सुवर्ण गणेश मंदिराचा गुरुवार व शुक्रवारी वास्तुशांती सोहळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी, ता. कागल येथे उत्तराभिमुख सुवर्ण गणेश मंदिराचा वास्तुशांती सोहळा येत्या गुरुवार दि. १४ आणि शुक्रवार दि. १५ रोजी होणार असल्याची माहिती संयोजनप्रमुख राजेंद्र आप्पासाहेब सुतार व ओमसाई बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. निपाणी -राधानगरी राष्ट्रीय महामार्गालगत उभारल्या गेलेल्या या मंदिरामुळे गावाच्या वैभवात भर … Read more

” बिद्री ” ची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड 15 डिसेंबरला होणार

मुरगूड (शशी दरेकर) : बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे सर्व 25 उमेदवार विजयी झाले. या नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड 15 डिसेंबरला होत आहे. कारखान्याच्या प्रधान कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित असून उपाध्यक्ष पदासाठी … Read more

कागल राष्ट्रीय महामार्ग वर गॅस ट्रक घसरला

कागल : कागल येथील राष्ट्रीय महामार्ग वर प्रोपीलीन गॅस वाहन करणार ट्रक (KA01AG7619) साईड रोड वर घसरला आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू असून रस्ता दळणवळणासाठी अरुंद झाला आहे. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत.रस्ते विकास महामंडळाने या बाबी कडे गांभीर्याने दखल घ्यावी.

जिल्ह्यात 23 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

collector

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्याला जादा दर द्यावेत तसेच सकल मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी करण्यात येणारी आंदोलने, साखळी उपोषण तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून … Read more

विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून जाणून घेतले निरनिराळ्या क्षेत्रातील कामकाज

निकम विद्यालयाची निरनिराळ्या ठिकाणी व्यावसायिक क्षेत्रभेट पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील): वर्तमान काळात व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असल्याचा दिसत असल्याने दर दिवशी नवनवीन पद्धतींचे व्यवसाय उदयास येत आहेत ज्यामुळे न केवळ बेरोजगारी कमी होत आहे तर सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील सहाय्य मिळत आहे. विद्यार्थ्याला एक उत्तम उद्योजक बनण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रभेट ही फायदेशीर ठरते हा उद्देश डोळ्यासमोर … Read more

error: Content is protected !!