कागलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले होते आयोजन कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कागल शहरातील गोपाळकृष्ण गोखले भाग शाळा, जयसिंगराव पार्क येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारांची … Read more

शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. टी. एम.पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) -समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.ते पद्मश्री डॉक्टर ग.गो.जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे आयोजित केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘शिक्षण हेच समाज उद्धाराचे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षण हा … Read more

मुरगुड येथील काशिलिंग बिरदेवार्षिक चैत्र यात्रा उद्यापासून सुरू

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगुड येथील ऐतिहासिक काशिलिंग बिरदेव वार्षिक चैत्र यात्रा शनिवार दिनांक १२एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पालखी सवाद्य ढोलांच्या गजरांच्या निनादामध्ये मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. सोमवार दिनांक १४ एप्रिल २५रोजी मानकरांच्या मानाची बकरी देवाला देण्यात येणार असून संध्याकाळी पाच वाजता भाकणूककार तुकाराम … Read more

ट्रॉलीखाली येऊन तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

मुरगूड(शशी दरेकर): सोनगे (ता. कागल) येथे घोरपडे गल्लीत टॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१०) दुपारी घडली. कु. शिवन्या विजय चिंदगे असे या बालिकेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत गावातील ट्रॅक्टर चालक दिग्वीजय विनायक कळंत्रे ( वय ३५) यांच्यावर … Read more

कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत मंगळवार दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी बहुउद्देशीय हॉल, तहसील कार्यालय जवळ पार पडले. या सोडतीद्वारे तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यामध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि खुला प्रवर्ग यांच्यासह महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाचा समावेश आहे. सकाळी … Read more

नामदार चषक क्रिकेट स्पर्धा दिमाखात संपन्न; निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा विजेता

कागल : महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल येथे आयोजित केलेली डे-नाईट क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेत निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. त्यांना रोख १ लाख रुपये आणि आकर्षक विजयी चषक देऊन गौरविण्यात आले. अमन आवटे युवा स्पोर्ट्स, कागल या संघाने … Read more

मुरगूड मध्ये श्रीराम नवमी भक्तिमय वातावरणामध्ये साजरी

भक्तांनी  नवीन मंदिर उभारणीचा केला संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी सकाळी महाअभिषेक होऊन महाआरती झाली. त्यानंतर ह भ प श्रीरंग पाटील महाराज हळदी करवीर यांचे कीर्तन पार पडले. यानंतर बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित … Read more

मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २ कोटी २७ लाखावर निव्वळ नफा – सोमनाथ यरनाळकर

संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतूक मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड  ता . कागल येथिलअग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २ कोटी २७ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची व १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याची माहिती सभापती श्री . सोमनाथ यरनाळकर यानीं दिली . यरनाळकर पुढे म्हणाले … Read more

कणेरीतील एस. पी. सोलर चे सचिनकुमार पाटील यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार

गोकुळ शिरगाव( सलीम शेख) : प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचे सर्वाधिक इन्स्टॉलेशन केल्याबद्दल कणेरी येथील एस. पी. सोलरचे सचिनकुमार अशोक पाटील यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालय येथे त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सचिन पाटील यांचे कौतुक करून त्यांना पुढील … Read more

कागलमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; मंदिरासमोरील झाड कोसळून वाहनांचे नुकसान

कागल : कागल शहरात दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कागलमधील लक्ष्मी टेकडीजवळील लक्ष्मी मंदिराच्या शेडमध्ये काही नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांची वाहने मंदिरासमोर पार्क केली होती. दरम्यान, मंदिरासमोरील एक मोठे झाड अचानक कोसळले. हे झाड अंदाजे दहा ते बारा दुचाकी … Read more

error: Content is protected !!