कागलमध्ये जल अमृत जयसिंगराव तलावाचे पाणी पूजन, प्रमोद कदम यांचा सत्कार

कागल (सलीम शेख) : कागल येथे श्रीमंत राजे वीरेंद्रसिंहजी घाटगे यांच्या शुभहस्ते जल अमृत जयसिंगराव तलावाचे पाणी पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. हा सोहळा अत्यंत भव्य आणि दिव्य वातावरणात संपन्न झाला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून, श्रीमंत राजे समरजीतसिंहजी घाटगे यांचे विश्वासू व कर्तव्यदक्ष सहकारी सूर्यकांत उर्फ प्रमोद सुबराव कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांची … Read more

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाचे पार्श्वभूमीवर  पोलिसांचे संचलन

कागल (प्रतिनिधी) : गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या दोन सणांचे अनुषंगाने कागल पोलिसांनी शहरातून फिरून  संचलन केले. संचलना करिता कागल पोलीस ठाण्याकडील एक अधिकारी व दहा पोलीस अंमलदार, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील एक अधिकारी व तीन पोलीस, कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील आर सी पी विभागाचा एक अधिकारी व सत्तावीस कर्मचारी हा इतका फौज फाटा कागल मध्ये … Read more

मुरगुड येथिल जवाहर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

शासकीय अधिकाऱ्यांची पाहणी मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नाका नंबर एक ते सरपिराजीराव तलाव इथपर्यंतच्या रस्त्याला जवाहर रोड असे नांव आहे. या रस्त्यावर पडलेल्या अनेक खड्ड्यांच्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. हा रस्ता रहदारीचा व मुरगूड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या रस्त्याच्या आजूबाजूस बीएसएनएल चे कार्यालय ,बँका, औषधाची दुकाने, दवाखाने, … Read more

पूर ओसरताच महावितरणची धडक मोहीम

राधानगरीतील ५ गावांचा वीजपुरवठा सुरळीत कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यात दूधगंगा नदीला आलेल्या महापुरात गेल्या दोन दिवसांपासून खंडित झालेला वीजपुरवठा अखेर महावितरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अथक प्रयत्नांनी पूर्ववत करण्यात आला आहे. वाळवा उपकेंद्राखालील ठिकपुर्ली गावठाण फिडरवरील पाच गावांमध्ये वीज नव्हती. ही कामगिरी यशस्वी झाल्याने या गावांमध्ये पुन्हा एकदा उजेड परतला आहे. या संदर्भात … Read more

मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचे शानदार उदघाटन

उद्घाटन दिवशी ३१ लाख ठेवींचे संकलन मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचा शानदार उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. बुधवार दिनांक २०.०८.२०२५ रोजीच्या उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ३१ लाख ठेवीचे संकलन झाले. मुरगूड येथे अवघ्या सहा महिने कालावधीतच नावारूपाला व सभासद ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या मुरगूड … Read more

कागल तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, मोठ्या प्रमाणात घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान

कागल (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून कागल तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी घरांची आणि जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. माहे ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात आली आहे. घर पडझड आणि गोठे नुकसान: २० ऑगस्ट २०२५ रोजी चिखली, हसुर खुर्द, मौजे सांगाव, बेलवळे बु., कुरणी, … Read more

कागलमध्ये संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

कागल प्रतिनिधी: कागल मध्ये संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली .सकाळी पादुका अभिषेक मकरंद सुर्यवंशी यांच्या हस्ते करणेत आला. संत सेना महाराज यांच्या फोटोचे पुजन कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले .कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी जननायक … Read more

सिद्धनेर्ली येथील दुधगंगा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद

कागल (दिनांक २० ऑगस्ट, बुधवार) – सिद्धनेर्ली गावाजवळील दुधगंगा नदीच्या पुलावर पाणी आल्याने, कागल-मुरगूड रस्त्यावरील वाहतूक आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स लावले आहेत. ​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज संध्याकाळी नदीचे पाणी सिद्धनेर्ली … Read more

मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी पतसंस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेऊन सर्वांच्या विश्वासास पात्र असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची ५० वी बार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .२४ / ८ / २०२५ रोजी दुपारी ठिक १२ वाजता श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल चिमगांव रोड ) येथे आयोजित करण्यात … Read more

के. डी. पाटील यांची EMSA कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष के.डी. पाटील यांची महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) च्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. पाटील यांच्या कार्याची आणि योगदानाची ही एक मोठी पोचपावती मानली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेज एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध … Read more

error: Content is protected !!