लोकमान्य टिळकांनी प्रखर राष्ट्रवादाचा विचार दिला. प्राचार्य – डॉ.टी. एम. पाटील.

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रखर राष्ट्रवादाचा विचार दिला. शिक्षण आणि समाज यासाठी चतु:सूत्रीची संकल्पना मांडली. ती आजही प्रेरणादायी आहे.लोकांना संघटित करून त्यांच्यात स्वातंत्र्याची जागृती निर्माण केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखन साहित्यातून सामाजिक व्यथा मांडल्या. ते कुशल संघटक होते. त्यांनी गिरणी कामगार चळवळीला भक्कम आधार दिला. शाहिरीच्या … Read more

Advertisements

मुरगूड ज्येष्ठ नागरिक संघामार्फत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ): येथील मुरगूड ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विरंगुळा केंद्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे होते. प्रारंभी एम टी सामंत आणि ज्ञानेश्वर चौगुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले . यावेळी एम टी सामंत यांनी … Read more

मुरगूड पोलीस ठाण्यातर्फे गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत उद्या बैठक

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील मुरगूड स्टेशनतर्फे आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत उद्या शनिवार दि. २/८/२०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजता श्रीराम मंगल कार्यालय भूते हॉल ( चिमगांव रोड ) येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर ( उपविभागीय पोलीस आधिकारी करवीर विभाग कोल्हापूर ) यांची उपस्थिती असून … Read more

मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्क घरफोडीचा पर्दाफाश

१८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक गोकुळ शिरगाव (सलीम शेख) ‌: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मेट्रो हायटेक को-ऑप टेक्सटाईल पार्क लि., कागल येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २० जुलै २०२५ रोजी पहाटे १ ते … Read more

गोकुळ शिरगावमध्ये चाकू हल्लात दोघे गंभीर जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव येथे बहिणीसोबत बोलण्यावरून झालेल्या वादातून चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास एमएससीबी कार्यालयासमोर हा प्रकार घडला. या घटनेची तक्रार साहिल शिवाजी वाघमारे (वय २१, रा. कागले माळ, गोकुळ शिरगाव) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली … Read more

आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची सुवर्णसंधी

आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची सुवर्णसंधी; कोल्हापूर जिल्ह्यात १४०० केंद्रांसाठी २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करा ! कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील एकुण 1400 नवीन आपले सरकार सेवा केद्रांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमुना व अटी शर्तीबाबतची माहिती तसेच नव्याने द्यावयाच्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या ठिकाणांची यादी जिल्ह्याच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध … Read more

शिराळा तालुक्यातील करुंगली-गुंडगेवाडीयेथील गावपुल पडल्यामुळे वाहतूकीस बंद

कोल्हापूर : आज दुपारी १.१० वाजता वारणा डावा कालवा कि.मी. १२ मधील सा.क्र. ११/२०० मी. करुंगली-गुंडगेवाडी ता. शिराळा जि. सांगली येथील गावपुल वारणा डावा कालव्याचा मधला पिअर ढासळून गाव पुल पडला आहे. सद्या प्रतिबंधांत्मक कार्यवाही म्हणून गाव पुलाच्या दोन्ही बाजूस जेसीबी व डंपरच्या सहाय्याने माती व मुरुमाचा ढिगारा टाकून बॅरीकेटस लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे या पुलावरुन … Read more

खेबवडे येथील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार, अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केला अज्ञानाचा उलगडा

मुरगूड : खेबवडे तालुका करवीर येथील स्मशान भूमीत एक बाहुली,काळया कपड्यात उडिद, नारळ, लिंबू, ड्रिल, टाचण्या, अंडे, तंबाखू चुना,राख असे बरेच काही एका टोपलीत बांधून मृतदेह जाळतात त्या ठिकाणी बांधून ठेवले होते. स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी दोन जागा असल्याने दोन्ही ठिकाणी हा प्रकार केला होता व एक ठिकाणी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून बाहुली टाकली होती.हा प्रकार ग्रामस्थांच्या … Read more

जीवन समृध्दीसाठी वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज – प्राचार्य. डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) : जीवन समृध्दीसाठी वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज असल्याचे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते गगनबावडा येथील पदमश्री. डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय व आनंदी ज्युनिअर कॉलेज यांच्या ” भारतीय संस्कृतीतील समाजजीवनात  वन्यजीवांचे महत्त्व ” या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आधुनिक युगात वन्यजीव, प्राणी, … Read more

मुरगूडच्या श्री लक्ष्मी – नारायण नागरी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल हिरकमहोत्सवाकडे घोडदौड करणारी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेणारी श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .०३ ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी ठिक ०२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात  बोलविण्यात आली आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि … Read more

error: Content is protected !!