राहुल गांधींवरील अन्यायी कारवाईचा कागल मध्ये निषेध

भाजपच्या विरोध बोलणाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय चुकीचा : प्रताप उर्फ भैया माने यांचे प्रतिपादन कागल दि.26 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यांच्या विरोधात कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज कागल एस टी स्टँड येथे मोर्चाकडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप … Read more

मुरगुडच्या परीट बंधुच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

मुरगूड ( शशी दरेकर ) : एकविसाव्या शतकात प्रामाणिपणाचा बुरखा घालून अनीतिमान काम करणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणा हरवत चाललेला पाहायला मिळतो. पैशाच्या हव्यास पोटी दिवसाढवळ्या फसवणूक करणार्‍या अनेक बातम्या आपण सोशल मीडिया मध्ये ऐकत असतो किंवा आजुबाजुला घडताना दिसत आहेत.अशा परिस्थितीत एखाद्याकडुन प्रामाणिक वागण्याची अपेक्षा … Read more

कागल येथे जयसिंग पाटील यांचा अपघात नसून घातपात – नातेवाईकांची तक्रार

भाऊ विक्रम पाटील यांची कागल पोलिसांकडे तक्रार कागल (प्रतिनिधी) – अनंत रोटो कागल येथे जयसिंग वसंतराव पाटील वय वर्षे 48 याचा अपघाती मृत्यू दोन दिवसापूर्वी झाला होता. हा मृत्यू अपघात नसून तो घातपात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी मयत जयसिंग चा भाऊ विक्रम वसंतराव पाटील यांने कागल पोलिसांकडे लेखी पत्राद्वारे केली … Read more

मुरगुड मुख्याधिकारी यांच्या वाहनाचा पिंपळगाव खुर्द जवळ अपघात

कागल : कागल मुरगुड रस्त्यावर दोन कारच्या धडकेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका बस कारमधील चालकास किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कागल मुरगुड रस्त्यावर पिंपळगाव खुर्दच्या दरम्यान मुरगूडकडून येणारी व कागल कडून येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात सायंकाळी तीनच्या सुमारास … Read more

इन्फ्लुएन्झा : ‘घाबरु नका.. खबरदारी घ्या..!’

इन्फ्लुएन्झा H3N2 या विषाणूंनं डोकं वर काढलं असून इन्फ्लुएंझा (H3N2)ची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून येत आहेत. तथापि सकस आहार, पुरेशी झोप, गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर त्याचबरोबर आजाराची लक्षणे आढळून आल्यावर वेळीच उपचार घेतल्यास इन्फ्लुएन्झा आजारातून लवकर बरे होता येते. म्हणूनच इन्फ्लुएन्झा आजाराला ‘घाबरु नका..पण खबरदारी घ्या..!’, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. … Read more

भगतसिंगाचे क्रांतीकारक विचारच भारताला तारतील – दलितमित्र डी. डी. चौगले

देशामध्ये जातीयवादी आणि धर्मांध विचारधारा पसरवून भारतीयांची डोकी भडकविण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत.यामध्ये संपूर्ण भारतीय समाज पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाण्याची भीती निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये भगतसिंगांसारख्या क्रांतीकारकांचे विचारच भारतीयांना तारतील असं प्रतिपादन दलितमित्र डी.डी.चौगले यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड येथे शहिद दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात बोलत होते. मुरगुड ता.कागल येथे समाजवादी प्रबोधिनी … Read more

मुरगूड येथील ” श्री. व्यापारी नागरी सह पतसंस्थेत स्वामी समर्थ प्रकट दिन

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात श्री . स्वामी समर्थ प्रकट दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . प्रकट दिनानिमित्य माजी सभापती व विद्यमान संचालक श्री . किशोर विष्णूपंत पोतदार यांच्या शुभहस्ते स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वामी समर्थांची आरती व ग्रंथ … Read more

मुरगुडमध्ये ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुका पेपर विक्रेता संघटना यांचे वतीने वृतपेपर विक्रेता ‘ व वृत्तपेपर व्यवसायातील कर्मचाऱ्यांना ई – श्रम कार्ड वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मुरगुड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये माजी प्राचार्य व ज्येष्ठ लेखक जीवनराव साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी दिवंगत वृत्तपत्र विक्रेते उत्तम जाधव यांची कन्या कु.सृष्टी उत्तम … Read more

निढोरीमध्ये उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताहला सुरूवात

मुरगूड ( शशी दरेकर ) : श्री भैरवनाथ मंदिर मौजे निढोरी ता.कागल येथे 37 वर्षाची परंपरा असणारा श्री रामजन्मोत्सव सप्ताह चैत्र शुक्ल 3 शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 ते चैत्र शुक्ल 10 गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. हा निढोरीतील 38 वा रामजन्मोत्सव सप्ताह आहे. काकडआरती, ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,प्रवचन,किर्तन व उपस्थितांसाठी अन्नदान … Read more

मुरगुडमध्ये गुढीपाडव्याची सोनरी पहाट घेऊन आली उंच गुडीचा थाट

मुरगूड ( शशी दरेकर ) : हिंदु धर्म संस्कृतीमध्ये, मराठी नववर्षातील पहीला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. मुरगुडमध्ये गुढीपाडवा साजरा करताना, मुरगुडवासीयांच्या चेहर्‍यावर एक नवचैतन्य पहायला मिळत होते. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे घेवून आलेल्या या सोनेरी दिवसाची सुरूवात सामर्थाचं प्रतिक असणाऱ्या उंचच्या उंच वेळकाठीच्या गुढ्या उभारून झाली. सकाळी पहाटेच्या प्रहरी प्रत्येकांच्या दारी मुरगुडवासीयांची गुढ्या … Read more

error: Content is protected !!