सह्यगिरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान

कोल्हापूर : सह्यगिरी शैक्षणिक विचार मंच यांच्या वतीने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणेसाठी सह्यगिरी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली होती.      या परीक्षेत 1237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी व धामणी खोरी या केंद्रातून जिल्हा गुणवत्ता  यादीतील 50 गुणवंत विद्यार्थी निवडून त्यांना पन्नास हजार रुपये … Read more

आज सायं. 6 पासून प्रचार बंद

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी  मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचार पूर्णपणे बंद करावा, … Read more

मुरगूड विद्यालयाच्या प्राचार्यपदी एस. पी. पाटील यांची नियुक्ती

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल मुरगूड विद्यालयाच्या, (ज्यूनियर कॉलेज ) च्या प्राचार्य पदी एस .पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपप्राचार्य पदी एम .डी. खाटांगळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिक्षण प्रसारक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या नियुक्ती नंतर प्राचार्य एस .पी. पाटील, उपप्राचार्य एम. डी. खाटांगळे यानी संस्थेचे चेअरमन डॉ . मंजिरीताई … Read more

लोकशाही सुदृढ करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे लोकसभा निवडणूक कार्यक्रम २०२४ अंतर्गत निवडणूक आयोगाच्या आधीसुचनेनुसार चुनाव का पर्व देश का गर्व या संदर्भाने मतदार जागृती करण्यासाठी आणि एकूण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाविद्यालयामध्ये मतदारांची प्रतिज्ञा घेण्याचेआदेश दिले आहेत. त्यानुसार “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाही वर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो … Read more

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कागलं तालुक्याच्या आत्मसम्मानाची व स्वाभिमानाची निवडणूक ! – पालकमंत्री ना. मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर ) – शक्तीशाली व सामर्थ्यवान भारतासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे . त्यामूळे सर्वांनी महायुतीच्या पाठीशी ठाम रहा. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक वेगळ्या ऐतिहासिक वळणावरची आहेच . त्याशिवाय ही निवडणूक कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे . तालुक्याच्या अस्तित्वाची , स्वाभीमानाची व आत्मसन्मानाची निवडणूक आहे . त्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन पालकमंत्री … Read more

शिव शाहू आंबेडकरांचा विचार दिल्लीच्या संसदेत जाणार – सतेज पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काय दिवे लावले हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. तुम्ही वाट चुकलात तुमच्या चुकीच्या वाटेवर आम्ही तुम्हाला पुन्हा सहकार्य करावं अशी अपेक्षा का करता ? आता जनतेचे पाच लाखाचं ठरलंय.पाच लाखाच्या उच्चांकी मताधिक्याने शिव शाहू आंबेडकरांचा विचार दिल्लीच्या संसदेत जाणार आहे,”असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त … Read more

पिंपळगाव खुर्द येथे ग्रामपंचायत कडून स्वच्छता मोहिम

सरपंच सौ. शीतल अमोल नवाळे सह ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतला पुढाकार पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील गावच्या कमानी नजीक मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले होते. सदर कचऱ्यामुळे गावात प्रवेश करताच समोर मोठ्या प्रमाणवर कचरा निदर्शनास येत होता. त्यामुळे ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द कडून जेसीबीच्या सहाय्याने हा कचरा हलविण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त … Read more

झाडे झुडप्यामुळे पिंपळगाव खुर्द पाझर तलाव बंधाऱ्याला धोका

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील असणारा पाझर तलावाला मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे आल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्यावर बाभळ, उंबर, कडूनिब सारख्या झाडाची मोठी वाढ झालेली आहे याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर बंधाऱ्याला याचा फटका बसणार आहे. भविष्यात बंधारा फुटण्याची ही शक्यता आहे. सध्या या तलावाकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे … Read more

मोदींची हॅट्रिक दिल्लीत कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक

भाजपाचे महासंपर्क अभियान कोल्हापूर दिनांक 24 :  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज असून दिनांक 26 एप्रिल रोजी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्तीकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष असे सर्वच एकाच वेळी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत आपापल्या बूथ मध्ये मतदारांशी संपर्क साधून मोदीजींना पुन्हा … Read more

चिमगाव  येथील  शाळकरी मुलाचा  विहीरीत बुडून मृत्यू

मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव तालूका कागल येथील शाळकरी मुलगा सोमवारी दुपारी एक चे  दरम्यान  विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रसाद रामचंद्र करडे वय १५ वर्षे असे मयताचे नाव असून सदर घटनेची नोंद मुरगूड पोलीसात  झाली आहे. मुरगूड पोलीसातून मिळालेली माहिती अशी प्रसाद त्याच्या         मित्रांसोबत चिमगावच्या शिवारातील  नारायण रामचंद्र वगदे     यांच्या विहीरीत  … Read more

error: Content is protected !!