बातमी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

कोल्हापूर, दि. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचेही आगमन झाले. कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री […]

बातमी

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांची इचलकरंजी येथील पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळास सदिच्छा भेट

कोल्हापूर, दि. 19 : शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी प्रधान सचिव माननीय श्री. विकास खारगेसाहेब यांनी पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळास सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाच्या उपक्रमाबद्दल सर्वच बाबतीत सखोल माहिती घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान मंडळामार्फत आयोजित केल्या जात असलेल्या विविध सांगीतिक उपक्रमांची माहिती घेतली. शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार या […]

बातमी

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर, दि. 18 : केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.45 वाजता श्री महालक्ष्मी (श्री अंबाबाई) मंदिर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता श्री अंबाबाई दर्शनासाठी राखीव. दुपारी […]

बातमी

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एक राज्यस्तरीय समिती स्थापन करणार रत्नागिरी, दि. 18 : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक मैदानावर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल, […]

बातमी

समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा – सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय वस्तीगृह, शासकीय निवासी शाळा व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांवर दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज […]

बातमी

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत निढोरीच्या सागर चितळेने पटकावले सुवर्ण व रौप्यपदक

४ X ४००मी. रिलेत प्रथम तर ४००मी. अडथळा शर्यतीत उपविजेतेपद मुरगूड ( शशी दरेकर ) – पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेमध्ये निढोरी ता. कागल येथील हौशी अँथलिट सागर बाळू चितळे या ३५ वर्षीय युवकाने ४ X ४०० मी. रिलेत प्रथम तर ४००मीटर अडथळा शर्यतीमध्ये उपविजेतेपद पटकावले. १९ […]

बातमी

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि.16 : शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, […]

बातमी

महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप

कोल्हापूर, दि. १६ : महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET साठी पात्र विद्यार्थ्यांचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी अभिनंदन केले. संबंधित विद्यार्थ्यांनी टॅबच्या माध्यमातून नावलौकिक करावे तसेच आपली गुणवत्ता सुधारावी, असे मत श्री. लोंढे यांनी महाज्योती मार्फत आयोजित मोफत टॅब वाटप कार्यक्रमामध्ये केले. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक महात्मा […]

बातमी

मुरगूडला बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची मान्यता

ग्रामीण व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणार शासकीय आणि खाजगी सेवेत नोकरीची संधी – खासदार प्रा. संजय मंडलिक यांची माहिती मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड (ता . कागल )येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या बी.एस.सी. नर्सिंग या चार वर्षाच्या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मान्यता दिल्याची माहिती संस्थेचे […]