छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे श्री शाहू उद्यान, कागल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, श्रीनाथ समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, संजय चितारी, पंकज खलीफ, … Read more

Advertisements

जितेंद्रसिंग ग्रुप चे अधिकाऱ्यांना झाड देऊन वृक्षतोडीचा अनोखा निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) – देवगड निपाणी महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे . या महामार्गाच्या विस्तारासाठी शेकडो वर्ष जुनी असलेले झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात आली. महामार्गाचे काम सध्या पूर्णत्वाकडे जात आहे. यावेळी नियमानुसार तोडण्यात आलेली झाडे लावण्यात यावी असा नियम आहे .या नियमानुसार मुरगुड येथील शिवभक्तांनी पाऊस सुरू झाल्यापासून महिनाभर त्याचा पाठपुरावा … Read more

दूरदृष्टी असलेला राजा म्हणजेच छ.शाहू महाराज : लिना कर्तस्कर

सुळकूड ( प्रा.सुरेश डोणे ) : दूरदृष्टी असलेला राजा म्हणजेच छ.शाहू महाराज.राधानगरी येथे धरण बांधून भविष्यातील पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडविला.कलेला आपल्या दरबारी राजाश्रय देऊन बहुजन समाज्याला न्याय देण्याचे काम छ. शाहू महाराजांनी केले असे प्रतिपादन कोल्हापूर येथील विमल इंग्लिश हायस्कूल च्या सचिव लिना कर्तस्कर यांनी केले. त्या छ.शाहू जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजाला समतेचा संदेश दिला – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजाला समतेचा विचार देऊन समाज जागृती केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात समाज सुधारणा करीत असताना शैक्षणिक, कृषी सिंचन, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले. ” स्त्री- पुरुष समानता, दलितोद्धार यासाठी ते आग्रही राहिले.” असे मत पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडाचे प्राचार्य … Read more

शाहू महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रेरणादायी : मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार

सुळकूड (सुरेश डोणे) : राजर्षी शाहू महाराज हे पारंपारिक राजाच्या कल्पनेत बसत नाहीत,तर ते थोर व्यक्तिमत्व आहे. हा माणूस सामान्यातला सामान्य माणसांपर्यंत पोचून स्वतःला त्यांच्यामध्ये विरघळून टाकतो. त्यांचे व्यक्तिमत्व हे अनेक पदरी, अनेक पैलू असणारे होते. त्यांच्यामध्ये अनेक ऊर्जा केंद्र होती.या कर्तृत्वाचे वाचन, पुनर्वाचन होणे गरजेचे आहे.त्यांचे व्यक्तिमत्व हे व्यामिश्र असल्यामुळे या राजाचा शोध घेताना … Read more

मुरगूडच्या श्री व्यापारी पतसंस्थेतर्फै स्कूल बॅगेंचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल आपुलकीची व समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारी ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने होतकरू व गरीब शालेय विद्यार्थानां स्कूल बॅगेंचे वाटप करण्यात आले .निमित्य होतं संस्थेच्या रौप्यमहोत्सवात पदार्पन केल्याचं. यावेळी आश्रम शाळा चिमगांव, मुरगूड येथिल जीवन शिक्षण विद्यामंदिर, शिवाजी विद्यामंदिर, कन्याशाळा, विजयमाला गर्ल्स हायस्कूल, … Read more

कागल मधील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा सुधारित प्रस्ताव द्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज आणि कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा कोल्हापूर, दि. 24 : कोल्हापूर कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून कागल शहरातील उड्डाणपूल पिलर वरतीच करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. त्यामुळे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करुन उड्डाणपूल लोकांच्या मागणीनुसार उभारावा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले. कागल शहरातील रहिवाशांच्या अडचणी, वाहतूक, उसाच्या … Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अधिकाऱ्यांची सिटी प्राईड  हॉस्पिटलला सदिच्छा भेट

कागल :  सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कागल इथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे, विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मा.श्री मंगेश चिवटे सर आणि कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रशांत साळुंखे यांनी काल सदिच्छा भेट दिली.       अगदी काहीच दिवसांपूर्वी सिटी प्राईडमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत अपघातातील रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक तरतुदीची सुविधा सुरु झाली. अल्पावधीतच या … Read more

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरगूड मधील जवाहर रोडवरील खड्ङ्यात वृक्षारोपन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मधील जवाहर रोड ‘झिंदाबाद ‘असे थोडे उपहासाने म्हणण्याची वेळ आली आहे. याची कारणे सुध्दा तशीच आहेत. एक तर हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे.मुरगूड मध्ये येणारी सर्व प्रकारची वाहने या रस्त्याने ये -जा करतात .    हा रस्ता खड्ड्यांनी इतका व्यापला आहे की प्रसिद्ध विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर … Read more

बिद्रीतील पारंपारिक बेंदूर सणात उत्साहात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग

माजी आमदार के. पी. पाटील यांचीही उपस्थिती बैल पळविण्याची ५० वर्षांची परंपरा बिद्री, दि. २२: बिद्री ता. कागल येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गावाला बैल पळविण्याची गेल्या ५० वर्षांची परंपरा आहे.  पारंपारिक पद्धतीने साजरा केलेल्या या कर्नाटकी बेंदूर सणात पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांनीही उपस्थिती … Read more

error: Content is protected !!