मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड गडहिंग्लज-कागल रस्ते बांधकाम प्रकल्पासाठी सुमारे २२ लाख रुपये किमतीच्या नवीन आणि अत्याधुनिक मशिनरीचे पूजन मुरगूड येथे उत्साहात संपन्न झाले. या मशिनरीमुळे रस्ते बांधकामाची कामे अधिक जलद, दर्जेदार आणि कमी वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी मुरगूड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव अंगज, राजेंद्र चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष दिगंबर परीट,एल. एस. गोधडे,शरीफ मोहम्मद (डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर), अभिजीत चोरे (डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर), विजय चौगुले (लायझनिंग ऑफिसर), शशिकांत पाटील, पत्रकार सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी, राजू चव्हाण यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही अद्ययावत मशिनरी विशेषतः मुरगूड येथील रस्ते बांधकामासाठीच आणण्यात आली असून, तिच्या मदतीने रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते अधिक मजबूत, टिकाऊ आणि कमी कालावधीत तयार होण्यास मदत होणार आहे.
या नव्या मशिनरीमुळे विकासकामांना गती मिळणार असल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.