कागल (सलीम शेख) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (दि. १४) कागल एस. टी. डेपो येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या समीर किरण कांबळे (वय २४, रा. आंबेडकर नगर, निपाणी वेस, कागल) या तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १७) सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय) येथे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे कागल परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा माणगाव येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्योत घेऊन आला होता. त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत कागल एस. टी. डेपो परिसरात गेला होता.

Advertisements

याच ठिकाणी त्याचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. या अपघातात समीर गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी त्याची प्राणज्योत मालवली.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे. समीरच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कागलमधील आंबेडकर नगर परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!