मुरगूड परिसरात पावसाची हजेरी

शेतातील झाड उन्मळुन पडल्याने विद्युत तारा तुटल्या मुरगूड ( शशी दरेकर ) : बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुरगूड व मुरगूड परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. गेले आठ दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. पण या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकानां दिलासा मिळाला. मुरगूड येथिल बहीर्जी पेट्रोल पंपाजवळून गावभागाकडे जाणाऱ्या रोडशेजारी … Read more

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे देणार का राजीनामा? डोंगळे एकाकी पडल्याची चर्चा

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. डोंगळेना संघातील इतर संचालकांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष अरुण डोंगळे वगळता संघाच्या सर्व संचालकांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर संचालकांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही सर्व एक संघ … Read more

बारा वर्षांच्या जिद्दीनंतर भरत झाला दहावी पास !

कोल्हापूर (सलीम शेख ) : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे भरत कांबळे या तरुणानं खरं करून दाखवलं आहे. तब्बल बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भरतनं दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आस सोडली नाही आणि योग्य मार्गदर्शनामुळे आज भरतच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि आत्मविश्वास दिसत आहे.भरतचं बालपण अत्यंत संघर्षमय परिस्थितीत गेलं. आई-वडिलांचं आधार नसताना … Read more

कागल औद्योगिक वसाहतीत दुचाकीस्वाराचा भिंतीला धडकून मृत्यू; इचलकरंजीतील युवक

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवारी मध्यरात्री भरधाव वेगात दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवधूत युवराज सुतार असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत हा गोकुळ शिरगाव येथील एका कारखान्यात मालवाहतूक करत होता. बुधवारी रात्री त्याने आपला मालवाहनाचा टेम्पो कारखान्यात लावल्यानंतर मित्राची मोटरसायकल  … Read more

मुरगूड विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.६७ टक्के

सुरभी शहा मुरगूड केंद्रात दुसरी तर पत्रकार अनिल पाटील यांच्या कन्या आर्या व आदिती या जुळ्या बहीनीनी मिळवले लख्ख यश मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित,मुरगूड विद्यालय (ज्युनिअर कॉलेज) मुरगुड मधील सुरभी स्वप्निल शहा हिने ९७टक्के गुण … Read more

कणेरीवाडीत जलकुंभ सोहळा उत्साहात संपन्न

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरीवाडी गावाचा अनेक वर्षांपासूनचा पाणीप्रश्न आता मार्गी लागणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या दोन भव्य जलकुंभांचे लोकार्पण नुकतेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी बोलताना शाहू महाराज म्हणाले, “कणेरीवाडीचा दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडवणे हे केवळ सुविधा देणे नव्हे, तर खरं लोकशाहीचे काम आहे. या जलजीवन … Read more

कागल शासकीय विश्रामगृहाजवळ स्विफ्टचा अपघात, एक किरकोळ जखमी

कागल (सलीम शेख ) : पुणे-दौंडहून गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या तीन जणांच्या स्विफ्ट गाडीला काल पहाटे कागल शासकीय विश्रामगृहाजवळील तीव्र वळणावर अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठी हानी टळली असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड येथील तीन मित्र गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. रात्री ते पुण्याला … Read more

मुंबईच्या रक्षणासाठी सज्ज ! सरकार, संरक्षण दल एकत्र

मुंबई: शत्रूच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण दल आणि राज्य सरकारने सुरक्षेचा आढावा घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईच्या रक्षणासाठी राज्य सरकार आणि संरक्षण दल एकदिलाने काम करतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. … Read more

आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेजचे दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश; 100% निकाल!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेजने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यावर्षीही १००% यश मिळाले .शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे हे उत्तम उदाहरण आहे. या परीक्षेत ओम श्रीकांत पाटील याने ९५.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, … Read more

आडी येथे परमपूज्य परमात्मराज महाराजांचे भक्तिमार्गावर मार्गदर्शन; हजारो भाविकांचा लाभ

आडी (राजकुमार पाटील) : नामस्मरण, पूजाअर्चा आणि सद्ग्रंथांचे वाचन यांसारख्या चांगल्या सवयी अंगीकारून भक्तिमार्गाची सवय जडवावी, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी येथील संजीवनगिरीतील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सकाळी श्रीदत्त मंदिरात दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक करण्यात आला, त्यानंतर महाआरती झाली. रात्री साडेसात … Read more

error: Content is protected !!