राज्याच्या परिवहन मंत्र्यांची नागरिकांसाठी तक्रार निवारण वेबसाईट

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांकरीता  हेल्पलाइन क्रमांक दिला आहे.  त्याबाबत महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद ही मिळाला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत परिवहन खात्याशी संबंधित असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांच्या करीता  www.pratapsarnaik.com या वेबसाईटवर सुविधा (Subscribe) व तक्रार निवारण (Grievances) या दोन्ही सोयी उपलब्ध परिवहन खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या आर टी … Read more

Advertisements

मुरगूड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शंकरराव पाटील यांचे दुःखद निधन

मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगूड नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शंकरराव महादेव पाटील   ( वय ८५ )  (अण्णा)  यमगेकर  यांचे वृद्धापकाळाने  दुःखद निधन झाले. कसदार व्यायामाने कमविलेली पिळदार देहयष्टी, रांगडा पण पहाडी आवाज, गोरगरीब जनतेशी  सदैव नाळ जोडलेली  त्यामुळे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व  होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे ते खंदे कार्यकर्ते होते.त्यांच्या मागे एक … Read more

गणपती कमळकर यांची सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कोल्हापूर येथे बदली

मुरगूड ( शशी दरेकर ) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून बदली झाली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत. डॉ. गणपती कमळकर यांनी यापूर्वी कागल येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करून आपल्या शैक्षणिक कार्याचा … Read more

श्री. व्यापारी नागरी मुदाळ तिट्टा शाखेचा २०वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुदाळतिट्टा शाखेचा २० वा वर्धापनदिन मोठया उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाला. सोमवार दि. ८/१२/२०२५ इ. रोजी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्य सकाळी ८.३५ वाजता सौ. व श्री. संदीप द. कांबळे यांच्या शुभहस्ते श्री. सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, … Read more

मुरगूडमध्ये समाजवादी प्रबोधिनीतर्फै डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल समाजवादी प्रबोधनीतर्फे ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यानां महापरिवर्तन दिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश साळुंखे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणे करण्यात आला.या अभिवादन प्रसंगी दलितांवरील अन्यायाला वाचा फोडणे व इतर त्यांच्या कार्याविषयी उपस्थितानी मनोगते व्यक्त केली. यावेळी कॉ. … Read more

‘जनतेचा विश्वास हीच मोठी पुंजी’ – परमात्मराज महाराज

परमाब्धि स्वप्न दाखवीत नाही, तर तुम्ही जे स्वप्न बघत असता ते स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करण्यास सुचवितो. तो भाविकांच्या  मनात आनंदी विचारांची सभा भरवतो आणि विषादाला दूर करतो. सर्व मानवांचे चांगले व्हावे असे चिंतन करतो, हा परमाब्धिचा स्वभाव आहे. म्हणून पूर्ण विश्वासाने परमाब्धिचा स्वीकार केल्यास निश्चितच कल्याण होईल, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते … Read more

कागल बसस्थानक दुरूस्तीसाठी बंद; प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कागल कागल : कोल्हापूर विभागाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) कागल बस स्थानकातील प्रवाशांना एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असल्याने दि. ०६/१२/२०२५ पासून हे बस स्थानक पुढील सूचना मिळेपर्यंत (काम पूर्ण होईपर्यंत) बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशांची … Read more

मुरगुड नगरपालिकेसाठी 88.43 टक्के मतदान

किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान मुरगुड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अत्यंत चुरशीने 88.43% इतके मतदान केले. 10128 मतदानापैकी 8956 मतदानाची नोंद झाली. मतदानाची ही आकडेवारी 88.43 इतकी होते.     किरकोळ बाचाबाची वगळता सर्व केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रावर ठाण मांडून होते मतदारांना … Read more

मुरगूड मध्ये पिसाळालेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे सात जण जखमी

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड शहरातील प्रमुख बाजारपेठेसह, गणेश मंदिर, बँक ऑफ इंडिया परीसर आदी विविध भागात पिसाळलेल्या कुत्र्याने काल सोमवारी सायंकाळी व आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच   धुमाकुळ घालत आकराजनांचा चावा घेऊन जखमी केले. त्यामध्ये अबाल वृद्धांचा समावेश आहे. माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यानीं ग्रामिण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींमध्ये- विठ्ठल दशरत … Read more

उसाच्या ट्रॅक्टरने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू; निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल

कोल्हापूर: पिंपळगाव बुद्रुक येथे रविवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते ११:०० वाजण्याच्या सुमारास उसाच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने एका २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम २७९, ३०४(अ), ४२७, ३३७, ३३८ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (ब) नुसार गुन्हा … Read more

error: Content is protected !!