रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मुंबई :   राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 28 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 30 जून 2025 रोजी 11.30 पर्यंत 3.4 ते 4.9 मीटर उंच लाटांचा इशारा … Read more

Advertisements

Maharashtra FYJC merit list 2025: पहिली गुणवत्ता यादी जाहीर, प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा

महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने एफवायजेसी (अकरावी) प्रवेशासाठी कॅप (CAP) फेरी १ ची जागा वाटप यादी/गुणवत्ता यादी आज, २८ जून २०२५ रोजी जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे, ते www.mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर पहिली गुणवत्ता यादी तपासू शकतात. महत्त्वाच्या तारखा: प्रवेश प्रक्रिया: विद्यार्थी त्यांचा अर्ज क्रमांक वापरून त्यांना मिळालेल्या कनिष्ठ … Read more

मुरगूड येथील सुर्यवंशी कॉलनीत बंद घर फोडून चोरी

सोने, चांदी दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांसह अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीतील बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून तिजोरीचे कुलूप उचकटून सोने-चांदी आणि रोकड अशा तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत रेखा टिपुगडे यांनी … Read more

CBSE 10 वी आणि 12 वी पुरवणी परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या नियमित बोर्ड परीक्षेत एक किंवा अधिक विषयांत अपेक्षित गुण मिळाले नाहीत किंवा जे आपले गुण सुधारू इच्छितात, त्यांच्यासाठी ही परीक्षा एक सुवर्णसंधी आहे. अधिकृत घोषणेनुसार, इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षा 15 जुलैपासून सुरू होऊन … Read more

राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापुर (प्रतिनिधी) : आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खऱ्या अर्थाने प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळांना देऊन मूलभूत घटकांची पायाभरणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिल्याशिवाय विकास शक्य नाही आणि आज अशा उपक्रमांद्वारे तेच कार्य त्यांच्यामार्फत होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावरती झाला तरच देशाचा विकास होत असतो, मात्र दुर्दैवाने आज भारतामध्ये फक्त … Read more

मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात राजर्षि शाहू यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघात राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात आले. यावेळी राजर्षि शाहू यांच्या प्रतिमेचे पूजन मारुती हरी रावण यांच्या हस्ते करून घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जमादार( पापा ) हे होते. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा . … Read more

छत्रपती शाहू यांना जयंती निमित्य मुरगूडकरांचे अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : आज शाहू जयंती निमित्त मुरगुड शहरात त्यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या जुन्या इमारती समोर असलेल्या शाहू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या इमारतीत शाहू छत्रपतींचे तीन वेळा वास्तव्य होते.   युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या कार्याबद्दल आपले मनोगत … Read more

मुरगुड नगरपालिका नोकर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत गोधडे तर व्हा.चेअरमनपदी विजय कांबळे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मुरगूड नगरपालिका नोकर सहकारी पत संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नूतन संचालक  मंडळाची बैठक संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये संस्थेच्या चेअरमन पदी जयवंत ज्ञानदेव गोधडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी विजय दत्तात्रय कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे … Read more

पिंपळगाव बुद्रुक येथे भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार

मुरगुड पोलीस ठाण्यात भीषण अपघाताची नोंद: एकाचा मृत्यू, अनेक जखमी मुरगुड, दि. २५ जून: कागल-निढोरी रस्त्यावर पिंपळगाव बुद्रुक येथे आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. एरटिका गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मुरगुड पोलिसांनी रामचंद्र अशोक शिंदे (वय ३५, रा. … Read more

तलावाचे स्वच्छ पाणी पुरवठा शहराला करावा मुरगूडच्या नागरीकांचे लेखी निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) – सरपिराजीराव तलावाचे पाणी स्वच्छ व मुबलक असताना वेदगंगा नदीचे गढूळ पाणी कशाला ? असा प्रश्न नगरपरिषदेला विचारून मुरगूडच्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.   महापुरातून वाहत येणारा गाळ, कचरा, मृत जनावरे ,लाकडे यामुळे नदीचे पाणी गढूळ होते.यात भर म्हणून नदीकाठच्या शेतातील रासायनिक खतांचा पाझर नदीत मिसळतो.असे प्रदूषित व … Read more

error: Content is protected !!