वाघापूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे अमृत महोत्सवी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गाव चावडी येथील ध्वजारोहण तलाठी के एम जरग यांच्या हस्ते, ग्रामपंचायत वाघापूर येथील ध्वजारोहण उपसरपंच सागर कांबळे यांच्या हस्ते झाले. विद्या मंदिर वाघापूर येथील ध्वजारोहण पुनम भोई यांच्या हस्ते तर वाघापूर हायस्कूल वाघापूर येथील ध्वजारोहण विज्ञान विषय … Read more

‘अन्नपुर्णा’ च्या उभारणीत सभासदांचे मोठे योगदान

कागल मध्ये सभासदांना शेअर्स कार्ड वाटप व्हनाळी – ता. 25 : माझ्यावर आणि माझ्या कर्तुत्वार प्रचंड विश्वास दाखवत मोलमजूरांपासून ते सर्वसामान्य शेतक-यांनी शेअर्स खरेदी केले त्यामुळेच अतिशय खडतर प्रवासात देखील श्री अन्नपुर्णा शुगर कारखाना उभा राहू शकला त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर सभासदांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन अन्नपुर्णाचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले. कागल येथे श्री … Read more

शिवराजमधील माजी शिक्षकांच्या भेटीने जुन्या स्मृतीना मिळाला उजाळा : पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या गेल्या 73 वर्षात सेवा बजावलेल्या सर्व माजी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व नातेवाईक यांच्या उपस्थितीत यावेळी येथील ‘शिवराज’चा वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, माजी शिक्षण संचालक महावीर माने, कार्यावाह आण्णासाो थोरवत, प्राचार्य पी. डी. माने यांच्यासह गेल्या 73 … Read more

बसस्थानक परिसरातील साईडपट्ट्या करा : पालिका प्रशासनाकडे मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : शहरातील बसस्थानक परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेल्या मुख्यमार्गावरील दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे.अशी मागणी या परिसरातील गाळेधारकांनी व नागरीकांनी नगरपरिषदेकडे लेखी मागणीद्वारे केली आहे. निवदेन असे,नगरपरिषदेच्या इमारती समोरील शिवतीर्थ परिसराचे कांही दिवसांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले आहे. याच परिसरातून ग्रामीण रुग्णालय व नगरपरिषदेच्या … Read more

सरवडे येथील जिज्ञासा प्री प्राइमरी स्कूलमध्ये श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

संपूर्ण सरवडे गावात शोभायात्रेचा कौतूकाचा व चर्चेचा विषय मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता . राधानगरी येथिल ” जिज्ञासा प्री -प्राइमरी ” स्कूलमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठया उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. राममंदिर प्राणप्रतिष्ठा पौष शुल्क व्दादशी शके १९४५या शुभदिवशी आयोध्यामध्ये मोठया भक्तीमय वातावरणात साजरा झाला . रामजन्मभूमिवर असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील … Read more

संस्कार हासबे ची राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील राणाप्रताप हॉलीबॉल क्लबचा खेळाडू व शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी कु.संस्कार निवृत्ती हासबे ( मुरगूड ) याची मिरज येथे होणाऱ्या १४ वर्षा खालील राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय संघात निवड झाली आहे. त्यास हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर, संभाजी मांगले, अजित गोधडे , विनोद रणवरे, सुहास भारमल, अमित … Read more

मुरगूड येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मुरगुड मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पौष शुल्क, द्वादशी शके १९४५ या शुभ दिवशी अयोध्या मध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला.रामजन्मभूमीवर राम बांधण्यात येत असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात श्रींरामाच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान झाली .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा भव्य … Read more

मुरगुड येथे चित्रकला स्पर्धेस उदंड प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : अयोध्या श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव समिती मुरगुड शहर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत शाळकरी मुलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. समितीच्या वतीने दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. लहान गट वय वर्ष ७ ते १२ आणि मोठा गट वय वर्षे १३ ते १६ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली होती. … Read more

दौलतवाडी येथे “राजे समरजीतसिंह घाटगे “यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : मा.दगडू शेणवी युवा मंच दौलतवाडी यांच्यावतीने श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त दौलतवाडी विद्या मंदिर येथील शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास गुरव होते .प्रमुख उपस्थिती संजय चौगले व दौवलतवाडीच्या सरपंच शितल जाधव ह्या होत्या. तर कार्यक्रमाचे संयोजक मुरगूड चे … Read more

error: Content is protected !!