एचपी ऑइल गॅसच्या वतीने कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीत घेण्यात आले बॉम्ब थ्रेड मॉक ड्रिल

कोल्हापूर(जिमाका): वेळ सकाळी 11 वाजताची.. एचपी ऑइल गॅसच्या कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथील मदर स्टेशन येथे एक निनावी फोन आला.. फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने गॅस स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून घातपात घडवणार आहोत, अशी धमकी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एचपी ऑइल गॅसच्या कंट्रोल रुमने त्वरित एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांना या घटनेची कल्पना … Read more

गोकुळ दूध संघाने गाय दूध दर कपात रद्द न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा

सिद्धनेर्ली येथील दूध उत्पादकांनी दिला इशारा कोल्हापूर(प्रा.सुरेश डोणे) : गोकुळ दूध संघाने गाय दूध दर कपात रद्द करून पूर्ववत दर न दिल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा सिद्धनेर्ली (ता.कागल) येथील दूध उत्पादकांनी दिला आहे.     गोकुळ दूध संस्थेचे चेअरमन अरुण डोंगळे यांना सिद्धनेर्ली (ता.कागल) येथील सिद्धेश्वर दूध संस्था व दूध उत्पादक यांच्यावतीने दूध दर कपाती … Read more

शिये येथे बिबट्याचा सदृश्य प्राण्याचा हल्ला; मेंढी ठार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : शिये ता. करवीर येथील मेंढ्यांच्या कळपावर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला करून शेळीची शिकार केली. ही घटना मामाचा माळा परिसरात मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास सर्जेराव शिसाळ, शंकर शिसाळ हे राखणीला होते. ते कळपाशेजारी जेवण करत होते. तेवढ्यात राखणीची कुत्री जोरजोरात भुंकू लागली. शेजारी असलेल्या … Read more

परमाब्धि ग्रंथाची निर्मिती दैवी इच्छेने – 

आडी (राजकुमार पाटील) : परमाब्धि ग्रंथाची निर्मिती दैवी इच्छेने झाली आहे. त्यामध्ये सार्वत्रिक व सार्वकालिक सद्विचार आहेत. याचा सर्व जातिधर्मपंथातील लोकांनी पूर्ण विश्वासाने स्वीकार करावा. याचा शुभ परिणाम निश्चित होणार आहे, असे प्रतिपादन प.पू. परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रीदत्त जयंती निमित्ताने आयोजित परमाब्धि विचार महोत्सवाच्या … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावरील सरनोबतवाडी येथे दुहेरी भूमिगत पूल उभारणीचे काम सुरु

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): सरनोबतवाडी ता.करवीर येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील जूना पूल पाडून त्या जागी नवीन दुहेरी भूमिगत पूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या नव्या पुलामुळे अवजड वाहनांची वाहतूक सुलभ होणार असून, सरनोबतवाडीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या पुलाची रुंदी वाढवून अवजड वाहनांना अडचणीशिवाय प्रवास करता येणार आहे. नवीन पूल दोन गाळ्यांचा … Read more

कागल येथील सीमा तपासणी नाका आजपासून कार्यान्वीत

कोल्हापूर (जिमाका):  प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल येथे महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि. या शासन नियुक्त सेवापुरवठादाराकडून संपूर्णपणे आधुनिक व संगणकीकृत सीमा तपासणी नाका उभारण्याची कार्यवाही पुर्ण झाली असून मंगळवार 10 डिसेंबर 2024 पासून कागल येथे सध्या कार्यरत असलेल्या तपासणी नाक्याऐवजी नव्याने स्थापित झालेला व संपूर्ण आधुनिकीकरण, संगणकीकरण झालेला सीमा तपासणी नाका कार्यान्वीत … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारां सोबत बैठक घेण्यात येईल – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर (जिमाका) : कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरु होत असून शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत केलेल्या वाढीव मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकऱ्यांची लवकरात लवकर बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येईल, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.        सन 2023- 24 गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम 2024-25 च्या 3 हजार 700 रुपयाच्या प्रतिटन … Read more

श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलची नवीन कार्यकारिणी निवड

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलची नवीन कार्यकारिणी निवडून आली आहे. या पंचवार्षिक कालावधीसाठी (2024-2029) श्री. एम. एस. पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये श्री. टी. के. पाटील उपाध्यक्ष, श्री. बापुसो बळवंत पाटील कार्यवाह, श्री. किरण त्रिबंक गोरे सह-कार्यवाह, श्री. महादेव पांडुरंग … Read more

अशोक दरेकर भारतज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल साहित्यिक श्री . अशोक दरेकर यानां विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेबद्ल” ग्रामिण पत्रकार संघ ” महाराष्ट्रराज्य यांच्यातर्फे कोल्हापूर येथे पुरस्कार देऊन त्यानां सन्मानीत करण्यात आले .मुरगूड येथिल इंजिनियर श्री . अशोक धोंडिबा दरेकर यांची विविध क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनिय कार्य विचारात घेऊन त्यानां हा पुरस्कार … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १२ दिनांक ०९-१२-२०२४ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

error: Content is protected !!