वेदगंगा नदीवर बांधलेल्या बस्तवडे-आनुर पुलाचा लोकार्पण सोहळा दिमाखात

ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाला सोहळा अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पुलाच्या बांधकामासाठी दहा लाखाचा निधी मंजूर……      प्रत्येकी २५ मीटर लांबीच्या चार बाळ्यांचा म्हणजेच १०० मीटर लांबीचा व ०७.७५ मीटर रुंदीचा सुसज्ज पूल उभारला…… हलगी- कैताळाच्या निनादात बस्तवडे आणि आनुर येथील माता-भगिनीनी आणला आंबील -घुगऱ्या, लाडू व केळांचा गारवा … Read more

Advertisements

ऊसाचे एकरी ८१ टन उत्पादन ; घोरपडे कारखान्याचे मार्गदर्शन

साके येथील बाळासाहेब तुरंबे यांचा ऊसशेतीत यशस्वी प्रयोग साके :   सागर लोहारसाके तालुका कागल येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब परसू  तुरंबे यांनी एकरी  35 ते 40 टनावरुन दुसऱ्याच वर्षी तब्बल एकरी 81 टनापर्यंत ऊसाचे विक्रमी उत्पन्न घेवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. यासाठी त्यांनी बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या … Read more

जगणे सुंदर होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा : तात्यासाहेब मोरे

व्हनाळी येथे कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व्हनाळी(सागर लोहार): जगाला आज कधी नव्हे इतकी कुशल मनुष्यबळाची गरज आहे.दोन वर्षांचे आय.टी.आय.चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जगणे सुंदर होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सध्या व्यवसायिक शिक्षण महत्त्वाचे असून आयटीआयच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनले आहेत. यशाला अनेक बाप असतात मात्र … Read more

सकस आहार, योग्य व्यायाम व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्यांनी कार्यरत राहून स्वविकास साधावा – डॉ. निता नरके

पिंपळगाव खुर्द(आण्णाप्पा मगदूम): श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर येथे झालेल्या किशोरवयीन मुला-मुलींच्या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार होते. सकस आहार,योग्य व्यायाम व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्यांनी कार्यरत राहून स्वविकास साधावा असे आवाहन मानवाधिकार पत्रकार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी डॉ. निता नरके यांनी केले. डॉ. निता नरके … Read more

मुरगूडमधील एम डी रावण – ” सृजन शिल्पकार पुरस्काराने सन्मानीत “

मुरगूड – ( शशी दरेकर) – मुरगूड ( ता कागल) चे माजी नगरसेवक व जेष्ट शिल्पकार एम .डी. रावण यांना सृजन वाचन व साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर चा ‘ सृजन शिल्पकार पुरस्कार ‘ बहाल करण्यात आला.थोर विचारवंत व लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूरच्या करविर वाचन मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष … Read more

मॅक च्या वतीने आम. चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली अर्पण

कागल: विक्रांत कोरे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार , उद्योजक व व्यापारी आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच आकस्मित दुःखद निधन झाले. मॅकमध्ये शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आम. चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन मॅक चे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष यशवंत पाटील,ऑन.ट्रेझरर प्रताप परुळकर व इतर मान्यवर उद्योजकांच्या उपस्थित करण्यात आले. व श्रद्धांजली … Read more

मेळाव्याला जाण्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना कर्नाटक पोलिसांनी अडवले

कागल : विक्रांत कोरेमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळावा टिळकवाडी (कर्नाटक) येथे असल्याने या मेळाव्यास शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय देवणे यांनाही निमंत्रित केले होते.ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरून जात असता कोगनोळी येथील आरटी- पीसीआर तपासणी नाक्यावर शांतता, सुव्यवस्था बिघडू नये या कारणाने महामेळाव्यात जाण्यास कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवून धरले व त्यांना परत महाराष्ट्रात … Read more

पवारसाहेबांनी समाजकारणाला पाठबळ दिले – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे प्रतिपादन

८१ व्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका राष्ट्रवादीतर्फे परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर संपन्न ८१ ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्राने गौरव  कागल : देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी हयातभर समाजकारणाला पाठबळ दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.  पाटील यांनी केले. सर्वच जाती -धर्मांना सोबत घेऊन सामाजिक सलोख्यातून शांतता या … Read more

बाचणी बंधाऱ्याजवळ मगरीचे पुन्हा दर्शन

बाचणी(तानाजी सोनळकर): बाचणी बंधाऱ्याजवळ मगरीचे पुन्हा दर्शन झालेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, बाचणी दूधगंगा नदीलगत दिसलेली मगर ही सुमारे नऊ फूट लांबीची असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाचणी मध्ये सामाजिक वनीकरन विभागाचे संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली असून मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, जोपर्यंत मगरीचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत दक्षता घेण्याचे … Read more

मुरगूडच्या “सदाशिवराव मंडलिक ” महाविद्यालयास विभागीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

मुरगूड (शशी दरेकर): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत मूरगूडच्या “सदाशिवराव मंडलिक ” महाविद्यालयाच्या मल्लांनी अकरा गुण मिळवून ग्रीकोरोमसन कुस्ती प्रकारात विजेतेपद पटकाविले. या यशाचे मानकरी खालील प्रमाणे 🙁 ग्रीकोरोमन) १) विजय डोईफोडे – ७७ किलो खाली – प्रथम २) रोहित पाटोळे – ५५ किलो खाली – द्वितीय. ३) मयूर सोनाले ८७ खाली – … Read more

error: Content is protected !!