शस्त्र परवाने 31 डिसेंबरपूर्वी नुतनीकरण करुन घ्यावेत

कोल्हापूर (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आत्मसंरक्षणार्थ शस्त्र परवाने वितरीत केले जातात. हे परवाने शस्त्र परवानाधारकांकडून दिलेल्या मुदतीत नुतनीकरण केले जात नाहीत. शस्त्र परवाना नुतनीकरणाची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात येणाऱ्या तसेच नुतनीकरणाची मुदत संपलेल्या सर्व शस्त्र परवानाधारकांनी आपल्या नावावरील शस्त्र परवाने संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून दिलेल्या मुदतीत नुतनीकरण करुन घ्यावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

Advertisements

शस्त्र अधिनियम 2016 चे कलम 24 अन्वये शस्त्र परवानाधारकांनी परवाना मुदत संपण्यापूर्वी 60 दिवस आधी नुतणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 21 अन्वये परवान्याची मुदत संपल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ शस्त्र जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा कलम 24 अन्वये कमीत कमी 2 वर्षे शिक्षा व दंड करण्याची तरतुद आहे. दिलेल्या मुदतीत परवाने नुतनीकरण करुन न घेतल्यास व विलंबाबाबत या कार्यालयाकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यास शस्त्र अधिनियम 1959 व शस्त्र अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे श्री. तेली यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!