
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव ता. करवीर: सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे गत काही दिवसांपूर्वी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली प्रतिभा दाखवली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी टी. के. पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील, आदिनाथ पाटील, सर्जेराव मिठारी, अँड विजयकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी लेझीम, झांज पथक, लाठी, काठी, योगासने आदींची मनमोहक सादरीकरणे केली.

जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी डी.सी.कुंभार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाबरोबर खेळाची आवड जोपासण्याचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवडत्या खेळात सहभागी होऊन प्राविण्य मिळवावे, असे आवाहन केले. प्राचार्य तेजस पाटील यांनी प्रास्ताविकात स्कूल राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांचा सत्कार संस्थापक प्राचार्य के. डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात उपप्राचार्या निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका शकुंतला, श्रेयस पाटील आदींसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
This post was very informative. I’d love to hear what others think about this topic. Let’s discuss and share more insights in the comments!”