हुपरी येथे ब्रम्हाकुमारी सेवाकेंद्रांतर्गत मिडीया संमेलन
व्हनाळी(सागर लोहार) : पत्रकारीता ही एक समाजसेवा आहे काळानुसार बदलती आव्हाने व वास्तव यांचे भान ठेवून कोणाशीही द्वेश मत्सर न बाळगता पत्रकाराने सुख, समाधान आणि मन: शांती या मुल्याच्या आधारे पत्रकारीता करून समाजात शांतीचा संदेश दिला पाहिजे. समाजात कांहीतरी चांगले करण्यासाठीच भगवंताने आपल्याला पत्रकार होण्याची संधी दिली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आजही पत्रकारांवर समाजाचा दृढ विश्वास आहे तो कायपणे पात्र ठेवण्याची जबाबदारी सर्व पत्रकार बांधवावर असल्याचे प्रतिपादन मार्गदर्शन प्रजपिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माऊंट अबू राजस्थान येथील मेडिया प्रमुख कोमल भाई यांनी केले.
ब्रम्हाकुमारी सेवाकेंद्र हुपरी ता.हातकणंगले येथे “बदलती पत्रकारिताआव्हाने आणि समाधान “यासंदर्भात आयोजित मेडिया संमेलनात ते प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करत होते.
प्रमुख उपस्थीत राजयोगिनी सुनंदा दिदी, सुनिता बहेनजी, सुभाष भाई, रघुनाथ भाई, एन.एस.पाटील, बाळासाहेब माळी, दगडू माने, संजय कुडाळकर, रामचंद्र ठिकने उपस्थित होते.
कोमल भाई पुढे म्हणाले, इंटरनेटच्या माध्यमातून जग हे हकेच्या अंतरावर आले असून पेन,फॅक्स ची पत्रकारीता आता कालबाह्य झाली आहे. तर आधुनिक सोशल मिडियाच्या माध्यामातून आवाहने स्विकारून बदलती पत्रकारीता सकारत्मक व समाजहित जोपासत करून समाजात शांतीचा संदेश दिला पाहिजे असे त्यांनी सर्व पत्रकारांना आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार एन .एस.पाटील सर,दगडू माने,रामचंद्र ठिकाणे,संजय कुडाळकर यांनी पत्रकारांच्या अडचणी व आव्हाने या विषयी विचार मांडले. या संमेलनाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमास सुभाष भाई, शुभांगी बहेनजी, रघुनाथ भाई,किशोर भाई, डिस्ट्रीक्ट रिपोटर्सचे कागल तालुका अध्यक्ष पत्रकार सागर लोहार,भास्कर चंदनशिवे,तानाजी पाटील,नंदकुमार कांबळे,मधुकर भोसले,कृष्णात कोरे, लक्ष्मण चावरे उपस्थित होते.
या संमेलनाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमास सुभाष भाई, शुभांगी बहेनजी, रघुनाथ भाई, किशोर भाई, डिस्ट्रीक्ट रिपोटर्सचे कागल तालुका अध्यक्ष पत्रकार सागर लोहार, भास्कर चंदनशिवे, इम्रान मकानदार, तानाजी पाटील, नंदकुमार कांबळे, मधुकर भोसले, कृष्णात कोरे, अमजाद नदाफ, बाळासाहेब कांबळे, मुबारक शेख, तानाजी घोरपडे, लक्ष्मण चावरे उपस्थित होते. स्वागत वसंत भाई यांनी केले तर आभार धनश्री बहेनजी यांनी मानले. यांनी केले तर आभार धनश्री बहेनजी यांनी मानले.