व्हनाळी – वार्ताहर : गोरंबे ता. कागल येथील श्री महादेव विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी शंकर कुंडलिक सांवत यांची तर व्हा.चेअरमनपदी शिवाजी बापू वास्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धनाजी पोवार यांनी काम पाहिले.
नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक विष्णूपंत गाकवाड, साताप्पा दावणे, रंगराव ढोले, पंडीत दंडवते, पांडूरंग पाटील, प्रकाश दंडवते, स्वाती पाटील, मंगल वैद्य, धोंडिराम परीट, रतन कांबळे तसेच अभिजीत दावणे उपस्थीत होते. आभार सचिव महादेव चौगुले यांनी मानले.