मुरगूड (प्रतिनिधी) – यमगे ता. कागल येथिल सिद्धाप्पा डोणे (वय ५६ )यांचे दुःखद निधन झाले. यमगे गावचे सुपुत्र आय .पी.एस अधिकारी बिरदेव डोणे व वासुदेव डोणे ( फौजी ) यांचे ते वडील होत.
अत्यंत साधे , कष्टाळू , मनमिळावू आणि संस्कारक्षम व्यक्तीमत्व म्हणून ते परिचीत होते .आपल्या मुलानां उत्तम संस्कार , शिक्षण आणि समाजसेवेची प्रेरणा देत त्यांच्या यशस्वी वाटचालीचा भक्कम पाया घातला . त्यांच्या मार्गदर्शनातून कुंटूंबाने समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.
Advertisements

त्यांच्या निधनाने यमगे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे , सुन , मुलगी असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवार दि . २६ / ११ / २०२६ रोजी आहे.