दूधगंगा सहकार डेअरी लिमिटेड कागलची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कागल (सलीम शेख): दूधगंगा सहकार डेअरी सोसायटी लिमिटेड, कागल या संस्थेची सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता दूधगंगा सांस्कृतिक भवन, बापूसाहेब महाराज चौक, कागल येथे हसत-खेळत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली.

Advertisements

सभेची सुरुवात महापुरुषांच्या आणि श्रीमंत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली.

Advertisements

सभेच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन सूर्यकांत उर्फ प्रमोद कदम यांनी श्रीमंत राजे घाटगे कुटुंबाचे विशेष आभार मानले. श्रीमंत सुहासिनी घाटगे आईसाहेब, जनतेचे नेते श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे आणि श्रीमंत नवोदिता घाटगे वहिनीसाहेब यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे नमूद करत, चेअरमन व सर्व सभासदांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

सभेत बोलताना  बाळासो हेगडे यांनी संस्थेचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या:

Advertisements

संस्थेच्या मोकळ्या जागेत शेड उभारून ते भाड्याने देणे.
संस्थेच्या इमारतीतील गाळे व इतर हॉलची दुरुस्ती आणि नूतनीकरण करून ते व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे.

या सूचनांचे स्वागत करत चेअरमन सूर्यकांत कदम यांनी सांगितले की, संस्थेच्या जागेतील मोबाईल टॉवरचा कार्यकाळ संपल्यानंतर हेगडे यांच्या सूचनेनुसार या जागेचा योग्य वापर केला जाईल. तसेच, सभासदांशी सविस्तर चर्चा करून संस्थेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.

सभासदांनी संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असल्याचे सांगत व्यवस्थापनाचे कौतुक केले. या प्रसंगी संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चेअरमन कदम यांचा सत्कार करण्यात आला.

या सभेस बाळासाहेब हवलदार, अजित सिंह घाडगे, अंजुमन खान, नायकवडी, शिवगोंडा पाटील, व्यंकटेश जोशी या प्रमुख मान्यवरांसह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

Leave a Comment

error: Content is protected !!